Virat-Rohit-Angry 
क्रीडा

Video: आधी विराट भडकला, मग रोहित संतापला; पाहा नक्की काय झालं...

विराज भागवत

Ind vs Eng 2nd Test: लॉर्ड्सच्या बाल्कनीतला हा प्रकार साऱ्यांनी पाहिला अन्...

Ind vs Eng 2nd Test: भारतीय संघ (Team India) पहिल्या डावात २७ धावांनी पिछाडीवर (Trail) राहिला. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाची वरची फळी अपयशी ठरली. लोकेश राहुल (KL Rahul), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या तिघांनीही झटपट आपल्या विकेट्स फेकल्या. पण उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे लयीत नसलेले खेळाडू (Out of Form) अचानक लयीत आले. दोघांनी संघाचा डाव सावरत अतिशय चिवट खेळी केली. दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही वेळ शिल्लक असताना दोघेही बाद झाले. जाडेजाही बाद झाला. त्यानंतर पंत आणि इशांत दोघे मैदानात असताना एक अशी गोष्ट घडली की त्यामुळे विराट आणि रोहित दोघेही प्रचंड संतापले.

नक्की झालं तरी काय?

इशांत शर्मा आणि ऋषभ पंत मैदानावर खेळत होते. त्यावेळी इंग्लंडमध्ये संध्याकाळची वेळ होतीच पण त्यासोबतच ढगांमुळे अंधारीदेखील आली. लाईट्स सुरू नसल्याने फलंदाजांना खेळण्यास अडचण येत होती. पण अंपायरला हे पंत किंवा इशांतने सांगितलंच नाही. त्यामुळे विराट आणि रोहित दोघेही प्रचंड भडकले. अपुऱ्या प्रकाशात पंत-इशांत खेळत असल्याचे पाहून या दोघांनी लॉर्ड्सच्या बाल्कनीतूनच त्यांना इशारे केले. अंधार झालाय.. दिसत नाही का? असं काहीसं विराट बोलला. त्यावर लगेचच, अंधारात खेळणार कसं, चेंडू दिसत नाहीये ते सांग ना अंपायरला, असं काहीसं रोहित बोलला. या प्रकारानंतर लगेच खेळ थांबवण्यात आला.

दरम्यान, त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव ३६४वर तर इंग्लंडचा ३९१वर आटोपला. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात राहुल ५ धावांवर बाद झाला. रोहितला चांगली सुरूवात मिळाली पण त्यानंतर तो २१ धावांवर तर विराट २० धावांवर बाद झाला. अखेर रहाणे-पुजारा जोडीने डाव सावरला. पुजाराने २०९ चेंडूत ४५ तर अजिंक्यने १४६ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांनंतर जाडेजा लगेचच बाद झाला. मग दिवसाचा खेळ संपेपर्यंत पंत (नाबाद १४) आणि इशांत (नाबाद ४) यांनी खेळपट्टी सांभाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Archery World Championship 2025 : भारतीय महिला तिरंदाजांचा ब्राँझपदकासाठी लढा; दक्षिण कोरियाशी लढत

भरदिवसा घरफोडी! 'वहागावात साडेचार तोळे दागिन्‍यांसह ३५ हजारांची रोकड लंपास'; वाई तालुक्यात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Asia Cup 2025 : सामना अमिरातीबरोबर, पण तयारी पाकविरुद्धची; आशिया चषक स्पर्धेत आजपासून भारताची मोहिम

SCROLL FOR NEXT