Rohit Sharma  esakal
क्रीडा

IND vs ENG: रोहितबाबत प्रश्नचिन्ह कायम! बाहेर गेल्यावर कोण करणार सलामी?

इंग्लंड दौरा राहुल द्रविड मात्र आशावादी

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमरा भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत असताना मुख्य प्रशिक्षक राहुल राहुल द्रविड यांनी रोहित शर्मा खेळण्याची शक्यता मावळली नसल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

कप्तान रोहित शर्माची कोरोना चाचणी काय येते याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अजून रोहित खेळायची शक्यता मावळली नाही. आम्ही कोणताच निर्णय त्याबाबत घेत नाही. गेल्या सहा-सात महिन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व विविध खेळाडूंनी केले आहे, ज्याचे मला स्वत:ला खूप आश्चर्य वाटत नाही. कारण परिस्थिती सतत बदलत आहे, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले.

एजबास्टन मैदानावर भारतीय संघाच्या सरावात क्षेत्ररक्षणावर जास्त भर दिलेला दिसला. विशेषकरून स्लीपमधील झेलांचा सराव करणे गरजेचे आहे. त्याचे कारण असे आहे की, इंग्लंडमध्ये बॅटची कड घेतल्यावर यष्टीरक्षक किंवा स्लिपमधील खेळाडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू स्विंग होऊन अगदी थोडी दिशा बदलायची शक्यता असते. चेंडूवर अगदी शेवटपर्यंत नजर ठेवावी लागते. मैदानात इतरत्र उडणाऱ्या झेलांना हा त्रास होत नाही. फक्त यष्टिरक्षक आणि स्लिपमधील क्षेत्ररक्षकाला सतर्क राहावे लागते. राहुल द्रविडने ‘सकाळ’शी बोलताना अगोदर एकदा इंग्लंड दौऱ्यादरम्यान सांगितले होते. याच अनुभवाचा वापर करत प्रशिक्षक राहुल द्रविड सराव करून घेताना दिसला.

कसोटी सामन्याच्या दोन दिवस अगोदर शेजारी-शेजारी दोन खेळपट्ट्या तयार केलेल्या एजबास्टन मैदानावर दिसत होत्या. इंग्लंडचा कप्तान बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्‍लम मैदानावर आल्यावर खेळपट्ट्या बघून मग पुढची योजना आखतील असे दिसत होते. इंग्लंड क्रिकेटचे चाहते सध्याच्या संघाच्या कामगिरीवर बेहद्द खूश आहेत. त्याचाच योग्य परिणाम बर्मिंगहॅम कसोटीच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यात दिसेल असे स्थानिक लोक सांगत होते. नेहमी भारतीय प्रेक्षकांची संख्या जास्त असते. १ जुलै रोजी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याला इंग्लंड संघाचे चाहतेही समान संख्येत असतील, अशी आशा संयोजकांना आहे.

गेल्या तीन सामन्यांत इंग्लंड संघाने खूप वेगळ्या विचारांचा खेळ करून कसोटी जिंकल्या. त्याची खूप चर्चा होत आहे. ब्रँडन मॅक्‍लमने पारंपरिक बचावात्मक पवित्रा घेत क्रिकेट खेळण्याच्या विचारात केलेला बदल मोठे काम करत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये सातेरीच्या दरीत पाचशे फुट चारचाकी कोसळली, वाहनात पती पत्नी; बचावकार्य सुरू

Arbaaz Khan Blessed with a Baby Girl: अरबाज खान पुन्हा बाबा झाला, शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

Latest Marathi News Live Update : मनुवादी वकिलाचा CJIवर हल्ला लोकशाहीला घातक : रोहित पवार

भाजप आमदार तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात, दमदाटी करणाऱ्यांना लाथा घालण्याचा 'सल्ला'

कोणी तरी येणार येणार गं! भारती सिंग पुन्हा आई होणार, चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली...'आम्ही पुन्हा प्रेग्नेंट'

SCROLL FOR NEXT