suryakumar yadav got injured during practice session ishan kishan bitten by bee  sakal
क्रीडा

IND vs NZ : सामन्यापूर्वी भारताला दुहेरी धक्का, सरावादरम्यान सूर्या जखमी, तर इशान किशनला चावल्या मधमाशा

Kiran Mahanavar

India vs New Zealand World Cup 2023 : धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सरावाच्या वेळी जखमी झाला.

यापूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादव संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूर्यकुमारच्या मनगटाला झाली दुखापत

नेटवर सराव करताना सूर्यकुमार यादवच्या मनगटावर दुखापत झाली होती. यानंतर सूर्यकुमार यादवला खूप वेदना झाल्या आणि सराव सत्र सोडावे लागले. यापूर्वी हार्दिक पांड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही.

इशान किशनला चावल्या मधमाशी

दुसरीकडे इशान किशनला शनिवारी नेट प्रॅक्टिस दरम्यान फलंदाजी करताना मानेच्या मागे मधमाशी चावल्या. मधमाशा चावल्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर त्याने फलंदाजी केली नाही.

दोघांच्या दुखापतीनंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड न्यूझीलंडविरुद्ध कोणत्या संघाकडून मैदानात उतरतात हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT