Rahul Dravid
Rahul Dravid File Photo
क्रीडा

द्रविडनं जिंकलं; स्वत:च्या खिशातून ग्राउंड स्टाफला दिलं बक्षीस

सुशांत जाधव

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. ग्रीन पार्कच्या मैदानात पाच वर्षानंतर कसोटी सामना खेळवण्यात आला. या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती. पण न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीनं चिवट खेळी करत भारताच्या विजयाचे स्वप्न भंगले. भारतीय संघाला यश मिळाले नसले तरी भारतीय संघाचा मुख्य कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) एका विशेष कारणामुळे चर्चेत आलाय.

द्रविडने कानपूरमधील ग्रीन पार्क स्‍टेडियमवरील स्टाफ कर्मचाऱ्यांसाठी 35,000 रुपये इतकी रक्कम दिली आहे. सर्वोत्तम खेळपट्टी तयार केल्याचे बक्षीस त्याने स्टाफ कर्मचाऱ्यांना दिले. कानपूर कसोटी सामन्यानंतर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. राहुल द्रविडने वैयक्तिकरित्या ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्यांसाठी 35 हजार रुपयांचे बक्षीस दिल्याचे त्यांनी सांगितले.

द्रविडला निष्पक्ष खेळ भावना जपणारा खेळाडू आणि प्रशासक म्हणून ओळखले जाते. कानपूरच्या मैदानात त्याची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली. तो केवळ खेळाडूंनाच प्रोत्साहन देत नाही तर खेळासाठी उत्तम वातावरण निर्माण करण्यासाठी मेहनत घेणाऱ्याचाही तो सन्मान करतो. मैदानातील खेळपट्टीवरुन अनेकदा वादंग उठल्याचे पाहायला मिळते. पण कानपूरची खेळपट्टी दर्जेदार असल्याचे पाहून द्रविडने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. द्रविडची ही शैली केवळ बक्षीस पात्र कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर क्रिकेटची आवड अशलेल्या प्रत्येकाला भावणारी अशीच आहे.

कानपूरच्या मैदानातील खेळपट्टी ही फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी निर्माण करणारी दिसली. पाच दिवसांच्या खेळात शेवटपर्यंत रंगत झाली. दोन्ही संघातील खेळाडूंशिवाय खेळपट्टी तयार करणाऱ्यांमुळे क्रिकेट चाहत्यांना कसोटीचा आनंद घेता आला. याची द्रविडने दखल घेतल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT