IND vs SA  sakal
क्रीडा

IND vs SA : पहिल्या सामन्यावर पावसाने फेरली पाणी; नाणेफेकही न होता झाला रद्द

Kiran Mahanavar

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला. डर्बन येथील सामन्यादरम्यान तुफान पाऊस पडल्यामुळे साधी नाणेफेक देखील होऊ शकली नाही.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यामुळे आता ही मालिका दोन सामन्यांचीच होईल. दुसरा सामना हा 12 डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना हा 14 डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येईल.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली होती. आता युवा संघ दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सलग दुसरी टी-20 मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरेल.

भारताचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. टीम इंडिया या मालिकेत सुरुवात करण्याकडे लक्ष देत आहे.

पावसामुळे सामना झाला रद्द

डर्बनमधील पाऊस थांबण्याची लक्षणे नाहीत त्यामुळे काही मिनिटांनी जर खेळ सुरू झाला नाहीतर सामन्याची षटके कमी करण्यास सुरूवात केली जाईल असे वाटले होते. मात्र पावसाने उसंतच घेतली नाही. त्यामुळे पहिला टी 20 सामना वॉश आऊट झाला.

आफ्रिकेत मुसळधार पाऊस, कधी होणार पहिल्या टी-20 सामन्याचे नाणेफेक?

डर्बनमध्ये सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे टॉसला विलंब होऊ झाला आहे. किंग्समीड स्टेडियमची खेळपट्टी कव्हरने झाकण्यात आली आहे. नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार होती, पण आता पावसामुळे उशीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : मुंढवा प्रकरणात शीतल तेजवानी यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT