India vs West Indies, 1st T20I  Rohit Sharma vs  Odean Smith
India vs West Indies, 1st T20I Rohit Sharma vs Odean Smith Sakal
क्रीडा

VIDEO : हिटमॅननं 6 कोटींच्या गड्याला Eden Gardens वर दाखवल्या चांदण्या

सुशांत जाधव

कोलकाता : ईडन गार्डन्सच्या मैदानात रोहित शर्माची वादळी खेळी पाहायला मिळाली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी निर्धारित 20 षटकात 7 बाद 157 धावांवर रोखलं. कॅरेबियन संघानं दिलेल्या 158 धावांचे टार्गेट परतवण्यासाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरले. या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली.

भारतीय संघाच्या डावाच्या सुरुवातीलाच रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक पवित्रा घेतला. दुसऱ्या षटकात त्याने शेफर्डला उत्तुंग षटकार खेचला. हा फक्त ट्रेलर होता... खरा पिक्चर पाहायला मिळाला तो भारतीय संघाच्या डावातील चौथ्या षटकात रोहितनं केलेल्या फटकेबाजीतून. ओडेन स्मिथच्या (Odean Smith) पहिल्या चेंडूवर रोहितनं खणखणीत चौकार खेचला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर स्मिथने सिंगल धावा दिल्या. त्यानंतर रोहितनं पुन्हा जोरदार फटकेबाजी केली. त्याने चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार आणि षटकाचा शेवच षटकाराने केला. या एका षटकात टीम इंडियाला 22 धावा मिळाल्या.

रोहित शर्मानं ईशान किशनच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत खास विक्रमही केला. सलग सातव्या सामन्यात भारतीय सलामी जोडीनं अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. Powerplay मध्ये टीम इंडियाने 58 धावा कुटल्या. रोस्टन चेसनं रोहितच्या खेळीला ब्रेक लावला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रोहितनं 200 + स्ट्राईक रेटनं 19 चेंडूत 40 धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. रोहितनं ज्या 6 कोटीच्या गड्याची हवा ताईट केली त्या ओडेन स्मिथनंच त्याचा कॅच घेतला.

आयपीएल लिलावात स्मिथला मिळाली होती मोठी रक्कम

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेपूर्वी बंगळुरुमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात पंजाब किंग्जनं कॅरेबियन अष्टपैलू ओडेन स्मिथवर पैशांची बरसात केली होती. 6 कोटी रक्कम देऊन पंजाबने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. रोहितनं त्याची अक्षरश: हवा काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

SCROLL FOR NEXT