Yuzvendra Chahal Rohit Sharma Sakal
क्रीडा

VIDEO : बॅट को नहीं लगा क्या? युजीवर भरवसा ठेवून रोहित फसला!

सुशांत जाधव

India vs West Indies, 1st T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यानं पहिल्याच षटकात कॅरेबियन संघाला धक्का देऊन त्याचा निर्णय सार्थही ठरवला. पण या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या पावर प्लेमध्येच दोन्ही रिव्ह्यू गमावल्याचे पाहायला मिळाले.

पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या रवि बिश्नोईच्या (Ravi Bishnoi) पहिल्या आणि वेस्ट इंडीजच्या डावातील आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर भारतीय संघाने रोस्टन चेसच्या विरोधात रिव्ह्यू घेतला. त्यानंतर लगेच नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर चहलने (Yuzvendra Chahal) पुन्हा चेस विरुद्धच पायचितची अपील केली. युजीनं रोहितला रिव्ह्यू घ्यायला लावला. यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) बॉल बॅटला लागला नाही का? असे विचारताना दिसले. युजीनं आत्मविश्वासाने बॉल पॅडला लागलाय बॅटला नाही, असा रिप्लाय दिला. त्याच्यावर भरवसा ठेवत रोहित शर्मानं दुसरा रिव्ह्यूही गमावला.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सलग चार वेळा घेतलेले रिव्ह्यू यशस्वी ठरले होते. यशस्वी रिव्ह्यूनंतर सोशल मीडियावर रोहित शर्माची जोरदार चर्चा रंगली होती. DRS घ्यावा की नाही यासंदर्भात रोहित शर्माची अगदी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखा (MS Dhoni) विचार करतो, असेही बोलले गेले. रोहित शर्माच्या DRS निर्णयावरुन लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. DRS चे नाव डेफिनेटली रोहित शर्मा सिस्टीम ठेवायला हरकत नाही, असे गावसकर म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

ST Bus : सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला! एसटीच्या प्रासंगिक करार भाड्यात ११ ते १९ रुपयांनी वाढ

Marathi News Live Updates : पुण्यातील माणिक बागेत अपघात; युवतीचा मृत्यू

iPhone Fold: Appleचा पहिला foldable iPhone होणार लाँच! 2 महत्त्वाचे फीचर्स असणार गायब; पाहा किती असेल किंमत..

SCROLL FOR NEXT