India’s Para Archer Sheetal Devi Sakal
क्रीडा

Paralympic 2024: जन्मत:च दोन्ही हात नव्हते, पण पायाच्या ताकदीवर शितलने परिस्थितीला हरवलं; ती आहे आजच्या युगाची 'अर्जुन'!

India’s Para Archer Sheetal Devi : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये १७ वर्षांची तिरंदाज शितल देवी सहाभागी होणार आहे. तिला जन्मत:च दोन्ही हात नव्हते, पण तिने जिद्दीने पॅरालिम्पिकपर्यंत पोहण्यापर्यंतचा प्रवास केलाय.

Pranali Kodre

India’s Para Archer Sheetal Devi Story: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचे ८४ खेळाडू सामील होत आहेत. या सर्वच खेळाडूंच्या जिद्दीची एक वेगळी कहाणी आहे, जी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. याच खेळाडूंमध्ये १७ वर्षांची शितल देवी हिचाही समावेश आहे.

अवघी १७ वर्षांची असलेल्या शितलला दोन्ही हात नाही. पण असतानाही ती तिरंदाजीत भारताचं नाव गाजवत आहे.

खरंतर एका व्यक्तीच्या आयुष्यात कोणतंही काम करायचं असेल, तेव्हा हात किती महत्त्वाचे असतात, हे सांगण्याची गरज नाही. हाताशिवाय अनेक गोष्टी अडू शकतात. पण असं असतानाही शितल मात्र जिद्दीने उभी राहिली आहे. तिनं परिस्थितीशी लढाई देताना यशाचं मोठं शिखर गाठण्याचा तिचा प्रयत्न आहे.

शितलचा जन्म जम्मूमधील एका छोट्या गावात झाला. घरात मुख्य व्यायसाय हा शेतीच. तिला जन्म झाला, त्याचवेळी तिला दोन्ही हात नव्हते. त्यामुळे ती तिची कामं पायानेच करत होती.

विशेष म्हणजे वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत तिने तिरंदाजीचा विचारही केला नव्हता. पण साल २०२२ मध्ये तिने जम्मूमधील कात्रा येथील श्री माता वैष्णो देवी बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला भेट दिली आणि ही भेट तिच्या आयुष्याला वळण देणारी ठरली.

तिथे ती तिचे प्रशिक्षक अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान यांना भेटली. त्यांनी तिला तिरंदाजीची ओळख करून दिली आणि तिनं नंतर कात्राला जाऊन सरावाला सुरुवात केली. ती दोन्ही हात नसताना तिरंदाजी करणारी पहिली महिला खेळाडू आहे. त्यामुळे सुरुवातीला तिला ट्रेनिंग देण्यासाठी प्रशिक्षकांना आणि तिला बरीच मेहनत घ्यावी लागली.

तिच्या पायांमध्ये ताकद आहे, हे त्यांनी जाणलं. सुरुवातीला तिरंदाजी करताना पाय दुखायचे पण तरी तिने माघार घेतली नाही.तिच्या प्रशिक्षकांनी स्थानिक साहित्य वापरून तिचे किट तयार केले होते. त्यांना तिच्यासाठी एक विशिष्ट्य शैलीही तयार करावी लागली. तिने सुरुवातीला रबर बँडने सरावाला सुरुवात केली. हळुहळू ती ५० मीटर अंतरावर बाण मारू लागली.

तिने अमेरिक पॅरा तिरंदाज मॅट स्टुझमनला आदर्श मानले आहे. विशेष म्हणजे २०१२ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मॅट स्टुझमन यांनी शितलला मार्गदर्शनही केले. सध्या जगभरात मोठ्या स्तरावर पायाचा आधार घेत तिरंदाजी करणारे खूप कमी खेळाडू आहेत. यात मॅट स्टुझमन हे पहिलेच.

Matt Stutzman - Sheetal Devi | Paris Paralympic India

२०२३ मध्ये वर्ल्ड तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशीप स्पर्धा झाली होती. त्यावेळी मॅट स्टुझमनने शितलची भेट घेत तिला आणि तिच्या प्रशिक्षकांना काही मोलाचे सल्लेही दिली होते. तिच्या तिरंदाजीच्या साहित्यात त्यांनी थोडा बदल सुचवला, ज्यामुळे तिला खेळताना आणखी फायदा होईल.

त्यावेळी आपण ज्याला आदर्श मानतो, त्याचेच मार्गदर्शन मिळण्याचा आनंदही शितलला होता. त्या स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले. इतकेच नाही, त्याआधी तिने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक, मिश्र आणि दुहेरी प्रकारात पदके जिंकली होती. तिने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले.

तिची प्रगती पाहाता आता तिच्याकडून पॅरालिम्पिकमध्येही मोठ्या अपेक्षा आहेत. ती भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताला दुसरं पदक मिळवून देणार का, याकडे अनेकांचे लक्ष असेल. तरी तिला या स्पर्धेत ब्रिटन, अमेरिका, दक्षिण कोरियाच्या खेळाडूंचंही मोठं आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT