Under 19 World Cup
Under 19 World Cup  sakal
क्रीडा

Under 19 World Cup : ज्युनियरमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया फायनल ; १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक,पाक उपांत्य फेरीत बाद

सकाळ वृत्तसेवा

बिनोनी : काही महिन्यांपूर्वी मुख्य एकदिवसीय विश्वककरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा सामना झाला होता. आता १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हेच संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. या कुमार विश्वकरंडक स्पर्धेत भारताने अगोदरच अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा अतिशय चुरशीच्या सामन्यात एक विकेट आणि पाच चेंडू राखून पराभव केला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ एकदाही आमनेसामने आले नाहीत.

वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १७९ धावांत गुंडाळले. त्यांच्या टॉम स्ट्राकर याने २४ धावांत ६ विकेट मिळवल्या. हा सामना ऑस्ट्रेलिया सहज जिंकणार, असे वाटत असतानाच त्यांना अखेरच्या षटकापर्यंत लढावे लागले. पाकिस्तानकडेही चांगले वेगवान गोलंदाज असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने १ बाद ३३ अशी सावध सुरवात केली; परंतु लगेचच त्यांची ४ बाद ५९ अशी घसगुंडी उडाली. १७ चेंडूंत त्यांनी तीन फलंदाज गमावले होते.

ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत येण्याची लक्षणे दिसत असताना सलामीवीर हॅरी डिक्सॉनने अर्धशतकी खेळी करून ऑलिव्हर पेकसह डाव सावरला. डिक्सॉन बाद झाल्यावर ऑलिव्हरने टॉम कॅम्पबेलसह सहाव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला, असे वाटत असताना ऑलिव्हर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने सातवा फलंदाज गमावला, त्या वेळी त्यांना विजयासाठी आणखी २५ धावांची गरज होती आणि तीनच विकेट शिल्लक होत्या. त्यानंतर अली राझाने दोन विकेट मिळवल्यामुळे सामन्यात रंग भरले. राफ मॅकमिलन याने अखेरच्या फलंदाज कॅलम विल्दर याच्यासह अखेरच्या विकेटसाठी १७ धावांची निर्णायक भागीदारी केली.

तत्पूर्वी पाकिस्तान संघाकडून अझान अवेस आणि अराफत मिनहास या दोघांनी अर्धशतके केली. त्यानंतर सर्वाधिक २० धावा या अवांतरच्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून तब्बल १३ वाईड चेंडू टाकण्यात आले. चेंडू चांगल्याच प्रमाणात स्विंग होत असल्यामुळे चेंडू वाईड ठरत होते. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्टाकरने २६ धावांतच पाकचे सहा फलंदाज बाद केले. मुळात पाकिस्तानची अवस्था ५ बाद ७९ अशी झाली होती. त्यांतर त्यांनी आणखी १०० धावांची भर घातली.

संक्षिप्त धावफलक :

पाकिस्तान : ४८.५ षटकांत सर्वबाद १७९ (अझान अवेस ५२, अराफत मिनहास ५२, अवांतर २०, माहिल बिअर्डमन १०-०-३८-१, टॉम स्टाकर ९.५-१-२४-६, टॉम कॅम्पबेल ६-०-२३-१) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ४९.१ षटकांत ९ बाद १८१ (हॅरी डिक्सॉन ५०, ऑलिव्हर पेक ४९, टॉम कॅम्पबेल २५, राफ मॅकमिलन नाबाद १९, उबेद शाह १०-०-४४-१, अली राझा १०-२-३४-४, अराफत मिनहास १०-१-२०-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT