U19-Asia-Cup
U19-Asia-Cup 
क्रीडा

U19 Asia Cup : टीम कुठलीही, पाकवर भारत नेहमीच भारी

वृत्तसंस्था

U19 Asia Cup : मोरातुवा (श्रीलंका) : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संपूर्ण संघ बदललेला असला तरी नव्या 19 वर्षीय भारतीय संघाचे पाकिस्तानवरचे वर्चस्व कायम राहिले. 19 वर्षीय आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (ता.7) झालेल्या सामन्यात भारताने 60 धावांनी शानदार विजय मिळवला. 

अर्जुन आझाद आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकामुळे निर्धारित 50 षटकांत 9 बाद 305 धावांपर्यंत मजल मारणाऱ्या भारताने पाकिस्तानचा डाव 46.4 षटकांत 245 धावांत गुंडाळला. विद्याधर पाटील आणि शुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी दोन तर अथर्व अंनकोलेकरने तीन विकेट मिळवले. 

राहुल द्रविड यांच्याऐवजी पारस म्हांबरे प्रशिक्षक असलेल्या भारतीय संघाने आपली हुकूमत कायम राखली. अर्जुन आणि तिलर या शतकवीरांमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 1 बाद 221 अशी सुरुवात केली होती; परंतु या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नांत बाद झाले. तळाच्या फलंदाजांनी तर फार निराशा केली. 

परंतु उभारलेल्या त्रिशतकी धावा गोलंदाजांन बळ देणाऱ्या ठरल्या कर्णधार रोहेल नाझीरने शतक केले. तो मैदानात असेपर्यंत पाकिस्तानचा लढ कायम होता, पण त्यानंतर हारिस खानचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या फलदाजांनी भारतीयांसमोर शरणागती स्वीकारली. 

संक्षिप्त धावफलक : 
भारत : 50 षटकांत 9 बाद 305 (अर्जुन आझाद 121 -111 चेंडू, 11 चौकार, 4 षटकार, तिलक वर्मा 110 -119 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार, सुशांत रावत 18, नसीम शहा 10-0-52-3, अब्बास अफ्रिदी 10-1-72-3) वि. वि. पाकिस्तान : 46.4 षटकांत सर्वबाद 245 (रोहेल नाझीर 117 -108 चेंडू, 12 चौकार, 3 षटकार, हारिस खान 43 -53 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, विद्याधर पाटील 9-2-28-2, सुशांत मिश्रा 7-0-37-2, अर्थव अंकोलेकर 10-0-36-3) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT