Ankita Bhakat Dhiraj Bommadevara  Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: भारताच्या धीरज-अंकिता ब्राँझ मेडलसाठी खेळणार, सेमीफायनलमध्ये कोरियाकडून पराभव

Ankita Bhakat-Dhiraj Bommadevara Archery: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीतील मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत हे ब्राँझ मेडलसाठी खेळणार आहेत.

Pranali Kodre

India Archery Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचे तिरंदाज धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत या जोडीला तिरंदाजीच्या मिश्र गटाच्या उपांत्य फेरीत कोरियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ते कांस्य पदकासाठी खेळतील. पण असे असले तरी ते इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहेत.

आत्तापर्यंत भारताला तिरंदाजीत ऑलिम्पिकमध्ये एकदाही पदक जिंकता आलेलं नव्हतं. त्यामुळे आता कांस्यपदक जिंकून धीरज आणि अंकिताला पहिलं पदक जिंकण्याची संधी आहे.

उपांत्य फेरीत भारताच्या जोडीने कोरियाच्या सियुन लिम आणि वूजिन किम या जोडीविरुद्ध सुरुवात चांगली केली होती. त्यांनी पहिल्या सेटमध्ये ३८-३६ ने आघाडी घेत २ गुण मिळवले होते. मात्र नंतरच्या तिन्ही सेटमध्ये ते कोरियाच्या जोडीच्या थोडक्यात मागे पडले. दुसऱ्या सेटमध्ये कोरियाच्या जोडीने त्यांना ३५-३८ अशा फरकाने मागे टाकले, तर तिसऱ्या सेटमध्ये ३७-३८ अशा अगदी एका पाँइंटच्या फरकाने त्यांना मागे पडावे लागले.

चौथ्या सेटमध्येही अवघ्या एका पाँइंटचा फरक राहिला. चौथा सेट कोरियाने ३८-३९ अशा फरकाने भारताविरुद्ध जिंकला. त्यामुळे हा सामना कोरियाने ६-२ अशा गुणांच्या फरकाने जिंकत अंतिम फेरी गाठत पदक पक्के केले.

आता भारताचा कांस्य पदकासाठीचा सामना शुक्रवारीच अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाविरुद्ध होईल.

उपांत्यपूर्व फेरीतची शानदार कामगिरी

धीरज आणि अंकिता यांनी शुक्रवारीच उपउपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला. या दोन्ही सामन्यांमध्ये या दोघांनीही शानदार कामगिरी करत पदकाच्या दिशेने आगेकूच केली. धीरज आणि अंकिता यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या दिआनंद कोइरुनसिमा आणि अरिफ पेंगस्तू यांना ५-१ गुणांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी स्पेनच्या एलिया कॅनालेस आणि पाब्लो गोन्झालेज अछा या जोडीविरुद्ध ५-३ अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT