Lovlina Borgohain
Lovlina Borgohain Twitter
क्रीडा

Olympics Schedule : हॉकी-बॉक्सिंगसह कुस्तीच्या आखाड्यात 'दंगल'

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील 13 वा दिवस भारतीयांसाठी आनंद देणारा असणार आहे. भारताची बॉक्सर लवलिना बोरगोहेन सुवर्ण पदकाच्या दिशेनं प्रवास करण्याच्या मजबूत इराद्याने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरेल. लवलिनाने सेमीफायनलमध्ये धडक मारत भारताचे पदक अगोदारच निश्चित केले आहे. यापुढे मजल मारण्याचा तिचा प्रयत्न राहिलं. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघ ऐतिहासिक कामगिरीत आणखी रंग भरण्यासाठी सज्ज असेल. भारतीय महिला हॉकी संघाने सर्वोच्च कामगिरीची नोंद केलीय. यापूर्वी 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत 6 संघ सहभागी असताना भारतीय महिला संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.

बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक निश्चित करणारी लवलिना आणखी एक पाउल पुढे जात गोल्ड किंवा रौप्य पदकाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसेल. जाणून घेऊयात बुधवारी कोणत्या खेळात कोणते भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत.

अ‍ॅथलेटिक्स:

नीरज चोप्रा, पुरुष भाला फेक क्वालिफिकेशन ग्रुप ए, सकाळी 05:35 वाजता

शिवपाल सिंह पुरुष भाला फेक क्वालिफिकेशन ग्रुप बी, सकाळी 07:05 वाजता

बॉक्सिंग:

लवलिना बोरगोहेन विरुद्ध बुसेनाज सुरमेनेली (तुर्की) महिला 69 किलो वजनी गट (सेमीफायनल) सकाळी 11: 00 वाजता

गोल्फ:

अदिती अशोक आणि दीक्षा डागर, महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले पहिली फेरी सकाळी 04:00 वाजता

हॉकी:

भारतीय महिला संघ विरुद्ध अर्जेंटिना सेमीफायनल दुपारी 03:30 वाजता

कुस्ती:

रवि कुमार विरुद्ध ऑस्कर टिगरेरोस उरबानो (कोलंबिया), पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गट सकाळी 08:00 नंतर

अंशु मलिक विरुद्ध इरिना कुराचिकिना (बेलारूस), महिला फ्रीस्टाइल 57 किलो, सकाळी 08:00 नंतर

दीपक पूनिया विरुद्ध एकरेकेम एगियोमोर (नायजेरिया), पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो, सकाळी 08:00 नंतर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT