Ire vs Ind
Ire vs Ind 
क्रीडा

Ire vs Ind: आयर्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाची 'सायकल सवारी'

Kiran Mahanavar

IND vs IRE: टीम इंडियाचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ आयर्लंडला पोहोचला आहे. भारताला आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहेत. हार्दिक प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 जिकंले आहे. टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतरही तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळेच आयर्लंड मालिकेसाठी हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

आयर्लंडला पोहोचल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू फिरायला गेले आहे. युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. चहलने शेअर केलेल्या फोटोमध्ये, तो सायकलवर फिरायला जाताना दिसत आहे. चहलसोबत दिनेश कार्तिक आणि ऋतुराज गायकवाडही आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहतेही जोरदार कमेंट पण करत आहेत. आयपीएल फ्रँचायझी राजस्थानने पण तिन्ही खेळाडूंचे सायकल चालवताना फोटो शेअर केले आहे.

आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अशा खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली नव्हती. उमरान मलिकचा आयर्लंडविरुद्धच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. या मालिकेत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्यावर असणार आहेत. भारतीय संघ टी-20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघ आयर्लंडविरुद्ध धडाका लावू शकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या चाहत्यांना धमाकेदार कामगिरीची अपेक्षा आहे.

भारतीय संघ -

हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सैमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT