india vs australia match tickets sold out but empty seats 
क्रीडा

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याकडेही प्रेक्षकांची पाठ? BCCI चा सुपर 'फ्लॉप शो'

Kiran Mahanavar

India vs Australia World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 यंदा भारतात खेळला जात आहे. या स्पर्धेत चार सामने खेळल्या गेल्या असून पाचवा सामना टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाशी होत आहे.

आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये प्रेक्षक फार कमी दिसले. कारण तेव्हा भारतीय संघाच्या सामने नव्हते, त्यामुळे प्रेक्षक इतक्या संख्येने सामना पाहिला आले नाही. पण टीम इंडिया मैदानात आली तेव्हाही ही संख्या प्रेक्षक अपेक्षेइतके दिसले नाहीत. अशा स्थितीत तिकीट विक्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण तिकिटांची विक्री झाली आहे पण स्टेडियम रिकामे दिसत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या सामन्याबद्दल बोलायचे तर, हा सामना रविवारी होत आहे. विद्यार्थ्याला सुट्टी आहे आणि कार्यालयेही बंद असतात, मग प्रेक्षक स्टेडियमपर्यंत का पोहोचत नाहीत. वृत्त लिहिपर्यंत चेन्नईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळून सुमारे तीन तास झाले असले तरी स्टेडियम अर्धेही भरलेले नाही. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 50 हजार आहे. त्यामुळे तिकीट विक्रीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असून सोशल मीडियावरही लोक टीका करत आहेत.

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यापासूनच स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या संख्येवरून गोंधळ सुरू आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात झाला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात फार कमी लोक दिसले. मात्र सायंकाळपर्यंत विक्रमी संख्येने प्रेक्षक तेथे पोहोचले.

पहिला सामना स्टेडियममध्ये 47518 लोकांनी पाहिला, हा एक विश्वविक्रम आहे. भारताच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीचा जागतिक विक्रमही मोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित होत राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT