India vs Malaysia Asian Games 2023
India vs Malaysia Asian Games 2023 
क्रीडा

Asian Games: भारतीय संघाने चीनमध्ये घातला राडा, २८ चेंडूत ठोकल्या १२८ धावा, शेफाली अन् जेमिमाची तुफानी खेळी

Kiran Mahanavar

India vs Malaysia Asian Games 2023 : आज भारतीय महिला क्रिकेट संघ 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना मलेशियाविरुद्ध खेळत आहे. जरी हा सरळ उपांत्यपूर्व सामना असणार आहे. या सामन्यात भारतीय संघ फेव्हरिट मानला जात आहे. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्मृती मानधना मलेशियाविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने शेफाली आणि जेमिमाची तुफानी खेळीच्या जोरावर 173 धावा केल्या.

शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा 2023 मध्ये विजयासाठी मलेशियाला 15 षटकांत 174 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे षटकांची संख्या एक डाव 15 षटकांपर्यंत कमी करण्यात आली.

प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित झाल्यानंतर भारताची सुरुवात चांगली झाली. शेफालीसह स्मृती मानधना (27) यांनी पहिल्या विकेटसाठी 5.2 षटकांत 57 धावा जोडल्या. यानंतर शेफालीने जेमिमासोबत डाव पुढे नेत दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भक्कम भागीदारी केली.

शेफालीने 39 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या, तर जेमिमाने 29 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या, ज्यात तिने सहा चौकार मारले. रिचा घोषने 7 चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्याच्या जोरावर भारताने 15 षटकात 2 गडी गमावून 173 धावा केल्या. दरम्यान भारतीय संघाने 22 चौकार आणि 6 षटकार मारत 28 चेंडूत 128 धावा ठोकल्या. मलेशियाकडून मास अलिसा आणि माहिरा इज्जती इस्माईलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT