India vs New Zealand test match preview 
क्रीडा

INDvsNZ : आम्ही कडवे आव्हान देणारच, कोई शक?

सुनंदन लेले

वेलिंग्टन : पहिल्या कसोटी सामन्याला फक्त दोन दिवस राहिले असताना भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ वेलिंग्टनला येऊन पोहोचले आहेत. वेलिंग्टन शहरात अधून मधून पावसाच्या सरी हजेरी लाव राहिल्याने भारतीय संघाने नियोजित केलेले सराव सत्र रद्द करावे लागले. खराब हवामानामुळे न्यूझीलंड संघातील काही खेळाडू वेलिंग्टनला वेळेवर पोहचू शकले नाहीत. ज्यात नील वॅग्नरचा समावेश होता जो आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतिक्षेत पत्नीसोबत थांबला आहे. 

पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडच्या संघ जाहीर केला गेला ज्यात दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेत लक्षणीय पदार्पण करणार्‍या कायल जेमीसनला संघात जागा दिली गेली आहे तसेच एजाज पटेल या एकमेव डावखुर्‍या फिरकी गोलंदाजाला प्राधान्य दिले गेले आहे.

न्यूझीलंड संघात कॉलिन डी ग्रंडहोम आणि कायल जेमीसन इतकेच जातिवंत अष्टपैलू खेळाडू आहेत असे वाटत असले तर मोठी चूक आहे कारण विकेट किपर बी जे वॉटलींग दर्जेदार फलंदाजही आहे. गेली काही वर्ष न्यूझीलंड संघ अडचणीत असताना वॉटलींगने सुंदर फलंदाजी करून मार्ग काढून दिला आहे. पस्तिशी पूर्ण करण्याच्या जवळ असलेल्या वॉटलींगची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 39 धावांच्या पुढची आहे आणि त्याने आठ शतके ठोकली आहेत याचा विसर पडता कामा नये.

न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने अत्यंत विचारपूर्वक ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर, एजाज पटेल आणि वॉटलींगला कसोटी सामन्यांपर्यत राखून ठेवले आहे. एकदिवसीय मालिकेत कायल जेमीसन, हेन्री निकल्स आणि टॉम लॅथमला चांगल्या खेळाची लय गवसली ही सकारात्मक बाब यजमान संघ मानत आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर भारतीय संघासमोर दोन कसोटी सामन्यात यजमान संघ कडवे आव्हान उभे करणार यात कोणालाच शंका असायचे कारण नाही.

19 आणि 20 तारखेला पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तवला गेला असल्याने भारतीय संघ सराव करायला उत्सुक आहे. बेसीन रिझर्व्ह मैदानावरच्या वार्‍याचा अंदाज घेणे सरावाशिवाय शक्य नसल्याने 19 फेब्रुवारीला भारतीय संघ जोरदार सराव करणार असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून समजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT