India Vs New Zealand World Cup 2023 Dharamsala Weather Report 
क्रीडा

Ind vs Nz : भारत अन् न्यूझीलंड सामना पावसात जाणार वाहून? जाणून घ्या धरमशाला मधील कसे असेल हवामान

Kiran Mahanavar

India Vs New Zealand World Cup 2023 Dharamsala Weather Report : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 21 वा सामना रविवारी हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे खेळल्या जाणार आहे. वर्ल्ड कप मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोघांनीही आपले चारही सामने जिंकले आहेत आणि चांगल्या नेट रन रेटमुळे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. यासोबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारताचा शेवटचा पराभव न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. 2019 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत किवी संघाने मँचेस्टरमध्ये भारताचा 18 धावांनी पराभव केला होता.

2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे खराब झाला होता, त्यामुळे सामना राखीव दिवशी पूर्ण झाला होता. एवढेच नाही तर दोन्ही संघांमध्ये लेग स्टेजमधील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आणि या सामन्यावर ही पावसाचा प्रभाव आहे. खरं तर, सामन्याच्या एक दिवस आधी शनिवारी आणि सामन्याच्या दिवशी म्हणजे रविवारीही धरमशालामध्ये पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे.

Accuweather.com च्या वृत्तानुसार, शनिवारी धरमशालामध्ये 40 टक्के पावसासह वादळ येण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट म्हणजे फारसा पाऊस पडणार नाही. दिवसभर ढगाळ वातावरण असेल.

त्याचवेळी रविवारीही धरमशालामध्ये असेच हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल, त्यावेळी 40 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे टॉसलाही विलंब होऊ शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते.

मात्र, सायंकाळी पावसाची शक्यता नाही. परंतु तापमान निश्चितपणे 12-13 अंशांच्या आसपास घसरण्याची शक्यता आहे. याचा अर्थ खेळाडूंना थंडीचा सामना करावा लागेल आणि या स्थितीत वेगवान गोलंदाजांना संध्याकाळी खेळपट्टीची अतिरिक्त मदत मिळू शकते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या साखळी सामन्यासाठी आयसीसीने कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. अशा स्थितीत पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात धरमशाला येथे खेळवण्यात आलेला शेवटचा सामनाही पाऊस पडला होता आणि केवळ 43 षटकांचा खेळ झाला. आता रविवारी धरमशाला येथे हवामान कसे असेल हे पाहायचे आहे. पूर्ण 100 षटकांच्या सामन्याचा थरार अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळते का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : संपूर्ण राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT