India Vs New Zealand World Cup Dharamshala Pitch Report 
क्रीडा

Ind vs Nz Pitch Report : जो जिंकेल तो एक नंबर, धरमशाला मधील खेळपट्टीवर कुणाचा चालणार सिक्का?

Kiran Mahanavar

India Vs New Zealand World Cup Dharamshala Pitch Report : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 चा 21 वा सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबरला धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ असे आहेत ज्यांनी या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकही सामना हारलेला नाही. अशा परिस्थितीत रविवारी धरमशाला येथे स्पर्धात्मक सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांच्या विजयाची शक्यता 50-50 अशी आहे.

हा सामना जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाईल. सध्या किवी संघ पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने जिंकले आहेत.

अशा स्थितीत रोहित सेनेने किवी संघाचा पराभव केल्यास ते अव्वल स्थानावर येईल. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या शानदार सामन्यात कशी असेल खेळपट्टी जाणून घेऊया....

भारत आणि न्यूझीलंड पिच रिपोर्ट

धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. जोरदार वारा आणि ढगाळ वातावरणामुळे चेंडू खूप स्विंग होतो. धरमशालामध्ये वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व निश्चित आहे. यासोबतच खेळपट्टीवरील उसळीही चांगली आहे.

सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांनी जर सावध रित्या खेळ खेळला तर मोठी धावसंख्याही फलकावर लावू शकतात. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूही चांगली कामगिरी करू शकतात.

या मैदानावर आतापर्यंत एकूण 7 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 4 सामने दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. टीम इंडियाने या मैदानावर 4 वनडे खेळले आहेत, त्यांचा येथे रेकॉर्ड 50-50 असा आहे.

धरमशालामध्ये ही रात्री मैदानावर दव दिसून येते. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT