IND VS PAK sakal
क्रीडा

IND VS PAK ICC T20 World Cup : मळभ दूर आता उत्कंठा शिगेला

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आज भारत-पाक महामुकाबला

सुनंदन लेले (saptrang.saptrang@gmail.com)

मेलबर्न : जोरदार वाऱ्यांनी मेलबर्नधील पावसाचे सावट दूर केले आणि भारत-पाकिस्तान सामन्याची उत्कंठा पुन्हा शिगेस पोहचली. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतल्या या महामुकाबल्यासाठी रंगमंच तयार आहे. निसर्गही साथ देण्यास तयार आहे. त्यात गतवेळच्या पराभवाची परतफेड करण्यास भारतीय संघानं कंबर कसली आहे.

कोणत्याही प्रकारच्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकने भारताला पराभूत केले नव्हते. गतवेळेस दुबईत ही परंपरा खंडित झाली होती. पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी रोहित शर्माच्या संघाला जोरदार खेळ करावा लागणार आहे. तयारी तर चोख झाली आहे, आता त्याच्या अंमलबजावणीची वेळ आली आहे.

२०१३ नंतर आयसीसी स्पर्धांचे कोणतेही विजेतेपद भारतीय संघाने पटकावलेले नाही ज्याची जाणीव आम्हाला आहे. त्याचे दडपण येत नाही, उलट आव्हान वाटत आहे. पाकिस्तानी संघ चांगला आहे. भारत-पाकिस्तान सामना होतो तेव्हा चांगल्या लढतीच्या अपेक्षा वाढतात. बरेच लोक पाकिस्तानी गोलंदाज वि. भारतीय फलंदाज अशा नजरेने सामन्याकडे बघतात. मला वाटते, की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगले करणारा संघच बाजी मारेल, असे रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले.

तो पुढे म्हणाला, गेल्या वर्षात बरेच टी-२० सामने खेळून भारतीय संघाची चांगली तयारी झाली आहे. खेळाडूंना मनमोकळेपणाचे आपले गुण दाखवता यावेत याकरिता संघातील वातावरण मोकळेढाकळे आणि भरवसा देणारे केले आहे. आता तयारी पूर्ण झाली आहे. कागदावर आखलेल्या योजना मैदानावर राबवण्याची वेळ आली आहे. सगळ्यांची इच्छा पूर्ण सामना व्हावा अशीच आहे, पण एक नक्की सांगतो, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी भारतीय संघाने लेली आहे.

तिकिटांची मागणी परत वाढली

मेलबर्न शहरात शुक्रवारी सकाळी जोरात पाऊस पडल्याने भारत वि. पाकिस्तान सामन्याच्या काळ्या बाजारातील तिकिटांची मागणी कमी झाली होती. शनिवारी दुपारनंतर पाऊस थांबला आणि लख्ख ऊन पडले आणि हवामान खात्याने पाऊस पडण्याची वर्तवलेली शक्यता कमी केली आणि लगेच तिकिटांची मागणी परत जोमाने वाढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

Mumbai News: पुलाचे काम रखडले! घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय

SCROLL FOR NEXT