T20 World Cup 2022 India vs Pakistan sakal
क्रीडा

IND vs PAK : उत्सुकता सामन्याची, चर्चा पावसाची; भारत-पाक सामन्यावर सावट

भारत वि. पाकिस्तान सामना जसजसा जवळ येत चालला आहे, तशी मेलबर्न शहरातील वर्दळ वाढू लागली आहे...

सुनंदन लेले

T20 World Cup 2022 India vs Pakistan : भारत वि. पाकिस्तान सामना जसजसा जवळ येत चालला आहे, तशी मेलबर्न शहरातील वर्दळ वाढू लागली आहे... २०१५ मध्ये भारत वि. पाकिस्तान सामना अॅडलेडला खेळवला गेला होता. ज्याची प्रेक्षक क्षमता मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या एक तृतियांश आहे. सामन्याचा आनंद मैदानात घेणारे जेव्हढे प्रेक्षक होते, तेवढेच क्रिकेटप्रेमी अॅडलेडला केवळ वातावरणाचा अनुभव घ्यायला आले होते. साहजिकच अॅडलेड शहराची हे सगळे हाताळताना तारांबळ उडाली होती.

अॅडलेडच्या सर्व हॉटेल, रेस्टॉरंटस्, खाण्याच्या छोट्या-मोठ्या स्टॉलवरचे अन्न अगदी संपून गेले होते. मेलबर्न त्या मानाने खूप मोठे शहर आहे. स्टेडियमही मोठे आहे; तरीही भारत-पाकिस्तान सामन्याच्या अगोदर आणि सामन्याच्या वेळी रविवारी काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. दुर्दैवाने मेलबर्न शहरातील हवामान बदलले असल्याने चर्चा पावसाची आहे.

शुक्रवारी चांगल्या हवामानाचा फायदा घेऊन काही भारतीय खेळाडूंनी मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या सराव सुविधांचा वापर केला. कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने फलंदाजांना जोरदार मारा केला. नंतर दीपक हुडा आणि अक्षर पटेल फलंदाजी करताना दिसले. प्रशिक्षक राहुल द्रविड सर्व सरावावर बारीक लक्ष ठेवताना दिसले. मेलबर्न क्रिकेट क्लबची सराव सुविधा मुख्य स्टेडियम बाहेरील मोकळ्या जागेत असल्याने सराव बघायला दर्दी क्रिकेटरसिकांनी हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT