India vs South Africa 2nd T20I update on Jasprit Bumrah  sakal
क्रीडा

IND VS SA : आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T-20 सामन्यात बुमराला पर्याय शोधण्याचा प्रयत्न

जसप्रीत बुमराशिवाय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळावी लागणार हे आता जवळपास निश्चित

सकाळ वृत्तसेवा

India vs South Africa 2nd T20I : जसप्रीत बुमराशिवाय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळावी लागणार हे आता जवळपास निश्चित आहे. यासाठी मानसिकतेबरोबर दुसरा पर्यायही तयार करण्याचा सराव भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उरलेल्या दोन सामन्यांतून करण्याची संधी आहे. यातील एक सामना उद्या होत आहे. बुमराच्या अनुपस्थितीत खेळताना भारताने आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. आजचा सामना नव्या तयारीसह मालिका जिंकण्यासाठीही महत्त्वाचा आहे.

गुवाहाटीत तसे फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत नाही, त्यामुळे तेथील क्रिकेटप्रेमींसाठी उद्याचा सामना पर्वणीच घेऊन आला आहे. सर्व तिकिटे संपलेली आहेत. दुर्गा पूजेचा उत्सव, त्यात क्रिकेटचा सामना; यामुळे गुवाहाटीमधील वातावरण बदलले असून सर्वत्र वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय खेळाडूंच्या बसलाही या कोंडीचा फटका बसला.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी बुमराला केंद्रस्थानी ठेवून भारतीय संघ व्यवस्थापनाने तयारी सुरू केली होती, परंतु आता डावपेच बदलावे लागणार आहेत, पण त्यासाठी दोनच सामने शिल्लक आहेत.

दक्षिण आाफ्रिकेविरुद्धच्या उरलेल्या दोन सामन्यांसाठी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. विश्वकरंडक स्पर्धेसाठी बुमराच्या ठिकाणी निवड करण्यासाठी आता मोहम्मद शमी, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांच्यात स्पर्धा आहे. शमी कोरोनातून मुक्त झाला असला, तरी त्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात हर्षल पटेलला विश्रांती देऊन सिराजला खेळवले जाण्याची शक्यता अधिक आहे.

अर्षदीप सिंगसह दीपक चहरचे स्थान कायम ठेवले जाईल. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या चहरला चांगला सूर सापडलेला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ४-०-२४-२ अशी कामगिरी केली होती. चहर हा भुवनेश्वर कुमारप्रमाणे स्विंग गोलंदाज आहे; मात्र ऑस्ट्रेलियातील हवामानात चेंडू स्विंग होत नाहीत. याचा विचारही आतापासून केला जाईल, म्हणूनच सिराजच्या कामगिरीवर लक्ष असेल.

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला विजयासाठी फार कष्ट करावे लागले नव्हते. गोलंदाजांनी अर्धी मोहिम फत्ते केली होती, परंतु १०७ धावांच्या आव्हानासमोर सुरुवातीला दमछाक झाली होती. सूर्यकुमारने फटकेबाजी केल्यामुळे विजय सुकर झाला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली अपयशी ठरले होते. आता उरलेल्या दोन सामन्यांतून त्यांना फलंदाजीतही सातत्य दाखवावे लागेल, तसेच विजयानंतरही संथ फलंदाजीमुळे टीका होणाऱ्या केएल राहुलला स्ट्राईक रेट सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर या गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

Mumbai News: मुंबई कोस्टल रोडसाठी 9 हजार झाडे तोडणार! बीएमसीचा मोठा निर्णय; वाचा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

SCROLL FOR NEXT