IND vs WI T20, Ravi Bishnoi debut: Sskal
क्रीडा

IND vs WI : बिश्नोईची कमाल; आधी 4 Wide; मग एकाच षटकात 2 विकेट

सुशांत जाधव

IND vs WI T20 Ravi Bishnoi Debut : वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये एका नव्या चेहऱ्याला संधी मिळाली. आयपीएलच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची फिरकी घेऊन लक्षवेधणाऱ्या रवि बिश्नोईनं टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. युजवेंद्र चहलने त्याला कॅप दिली. आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणारा तो भारताचा 95 वा खेळाडू ठरला.

पॉवर प्लेमध्येच कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याच्या हाती चेंडू दिला. वेस्ट इंडिजच्या डावातील आठवी आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपल्या पहिल्या षटकात रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) याने तीन चेंडू व्हाइड टाकले. या तीन अवांतर धावेसह त्याने आपल्या पहिल्या षटकात 4 धावा दिल्या. पण दुसऱ्याच षटकात त्याने जबरदस्त कमबॅक केले. 10 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने रोस्टन चेसच्या रुपात त्याने पहिली विकेट घेतली. याच षटकात त्याने पाचव्या चेंडूवर पॉवेलला तंबूचा रस्ता दाखवला. चार व्हाईड चेंडू टाकून एकाच षटकात दोन विकेट घेत त्याने दमदार पदार्पण केले आहे.

भारतीय संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणात सर्वाधिक दमदार कामगिरी करण्याचा विक्रम हा प्रज्ञात ओझाच्या नावे आहे. 2009 मध्ये बांगलादेशविरुद्दच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 21 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ या यादीत अक्षर पटेलचा नंबर लागतो. 2015 मध्ये झिम्बावे विरुद्ध पहिला टी-20 सामना खेळताना पटेलनं 17 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या होत्या. रवि बिश्नोईनं आपल्या 4 कोट्यांच्या षटकात 17 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT