क्रीडा

आता फुटणार टी-२०चे फटाके

वृत्तसंस्था

कोलकाता - भारतात दिवाळीची लगबग ऐनभरात आली आहे आणि त्यातच टी-२० सामन्यांच्या आतषबाजीचे फटाके रविवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर फुटणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताला विश्‍वविजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी आणि ‘सुपरमॅन’ विराट कोहली यांच्याशिवाय मैदानात उतरणाऱ्या रोहित शर्माच्या भारतीय संघासमोर मायदेशातील वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे. रिषभ पंतसाठी धोनीने आपली जागा रिकामी करून दिली असली तरी तो संघाच्या तयारीचा महत्त्वपूर्ण घटक असेल, असा खुलासा विराटने धोनीला संघातून वगळल्यानंतर केला असला, तरी त्याला संघातून वळगले हे सत्य आहे.

जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या वेस्ट इंडीज संघाला भारताने कसोटी मालिकेत २-० आणि एकदिवसीय मालिकेत ३-१ असे पराभूत केले असले, तरी टी-२० मध्ये भारतीयांचा कस लागण्याची शक्‍यता आहे. वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व कार्लोस ब्राथवेट करत असून, किएरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल असे टी-२० स्पेशालिस्ट संघात परतले आहेत. त्यांच्या साथीला फॉर्मात असलेला हेटमेर आहेच, त्यामुळे भारतीय गोलंदाजांची जबाबदारी वाढली आहे.

अर्थात, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्‍वर कुमार यांच्यासमोर या ताकदवर विंडीज फलंदाजांनाही सावध राहावे लागणार आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदही टी-२० मधील आपली उपयुक्तता दाखवण्यास सज्ज असेल. फिरकीची प्रमुख मदार कुलदीप यादववर आहे; पण कुणाल पंड्या तसेच शादाब नदीम यांना संधी देण्यात आल्यामुळे यझुवेंदर चहलला अधिक अचूकता दाखवावी लागेल. 

भारताची ताकद फलंदाजी असली तरी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अनुभवात कमी आहेत. अपवाद दिनेश कार्तिकचा; पण त्याला संधी दिली जाते का? किंवा पंतला यष्टिरक्षक म्हणून पसंती मिळणार का, याची उत्सुकता असेल. विराट खेळत नसल्यामुळे कार्तिक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवू शकतो. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे या नवोदितांना आपली उपयुक्तता दाखवण्याची ही नामी संधी असेल.

संघ यातून निवडणार - 
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यझुवेंदर चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव आणि शहाबाज नदीम.
वेस्ट इंडीज - कार्लोस ब्राथवेट (कर्णधार), फॅबिन अलेन, डॅरेन ब्रावो, शिमरोन हेटमेर, किमो पॉल, किएरॉन पोलार्ड, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, शेरफेन रुदरफोर्ड, ओशाने थॉमसन, खारे पिरे, ओबदे मॅकॉय, रोवमन पॉवेल, निकोलस पुरम.

ईडनवर रोहित बरसणार?
ईडन गार्डन हे मैदान रोहित शर्मासाठी खास आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक २६४ धावांची खेळी त्याने याच मैदानावर केलेली आहे; तसेच मुंबई इंडियन्सला २०१३ आणि २०१५ मध्ये दोन आयपीएलचे विजेतेपद याच मैदानावर त्याने कर्णधार म्हणून मिळवलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT