india w vs bangladesh w sakal
क्रीडा

Ban vs Ind : खेळण्यापूर्वीच बिघडली तब्येत, भारताविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यातच खेळाडू ड्रेसिंग रूममधून थेट रुग्णालयात

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Womens : भारतीय महिला संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे ते एकदिवसीय मालिका खेळत आहेत. बांगलादेश महिला क्रिकेट संघाने प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पराभव केला, 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात 16 वर्षीय अष्टपैलू शोर्णा अख्तरने बांगलादेशकडून पदार्पण केले, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण अत्यंत दुर्दैवी ठरले. शोर्ना अख्तर फलंदाजीसाठी मैदानात आली नाही आणि रिपोर्ट्सनुसार तिला अपेंडिसायटिस त्रास होत होता, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत शोर्ना अख्तरची बॅटने सरासरी कामगिरी होती, त्यामुळे तिला एकदिवसीय मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली. शोर्णाने यावर्षी अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेतही तिच्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात तिच्या इच्छेनुसार होऊ शकली नाही.

शोर्ना अख्तरने आतापर्यंत 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे ज्यात तिने 16 च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीमध्ये 3 बळीही घेतले आहेत.

बांगलादेशने महिलांच्या वनडेत प्रथमच भारताचा केला पराभव

बांगलादेश महिला क्रिकेट संघ आणि भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. यजमान संघाने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार हा सामना 40 धावांनी जिंकला आणि वनडे क्रिकेटमध्ये प्रथमच टीम इंडियाचा पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 44 षटकात 152 धावांवर ऑल आऊट झाला, याला प्रत्युत्तरात टीम इंडियाही अवघ्या 113 धावांवर ऑलआऊट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT