India will stage a MotoGP race for the first time in 2023 esakal
क्रीडा

भारतात पहिल्यांदाच MotoGP चा थरार; CM योगी म्हणतात, UP साठी गौरवशाली क्षण

अनिरुद्ध संकपाळ

MotoGP Race 2023 In India : मोटो जीपीच्या आयोजकांनी आगामी 2023 ची स्पर्धा ही भारतात होणार असल्याची घोषणा आज केली. भारतात पहिल्यांदाच मोटो जीपीचा थरार रंगणार आहे. आयोजकांनी या खेळाचा प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी जवळापस 140 कोटी लोक असलेल्या देशात MotoGP चे आयोजन करण्याचे ठरवले. ही रेस बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट येथे होईल. यापूर्वी बुद्ध सर्किटवर 2011 ते 2013 पर्यंत तीन फॉर्म्युला वन ग्रँड्स प्रिक्स झाल्या आहेत. (India will stage a MotoGP race for the first time in 2023)

दरम्यान, मोटो जीपचे सीईओ कारमेलो एझपेलेटा यांनी सांगितले की, 'आमचे भारतात खूप फॅन्स आहेत. त्यामुळे MotoGP भारतात आणायला आम्ही उत्सुक आहोत. याचबरोबर भारत हा मोटरसायकल उद्योगासाठी मोठी बाजारपेठ आहे. MotoGP चा विस्तार भारतात विस्तार झाल्यास याचा फायदा टू व्हीलर जगताला देखील होईल.'

भारताची लोकसंख्या मोठी आहे येथे 20 कोटीपेक्षा जास्त मोटरसायकल वापरल्या जातात. त्यामुळे या रेसच्या माध्यमातून या बाजारपेठेतील विदेशी गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाऊ शकतात. भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आयोजकांच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. हा देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागतिक स्तरावरची ही रेस उत्तर प्रदेशमध्ये आयोजित होणे हा उत्तर प्रदेशसाठी गौरवशाली क्षण असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT