India wins 3 bronze medal in asian wrestling championship 
क्रीडा

आशियाई कुस्ती : भारतीयांना तीन ब्रॉंझचाच दिलासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने आशियाई कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारातील मोहीम अखेर पाच पदकांच्या कमाईने संपली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन ब्रॉंझ पदकांवर समाधान मानावे लागले. चीनसह तीन देशांचा असहभाग तसेच अनेक प्रमुख कुस्तीगिरांचा असहभाग असूनही भारतास फारसे यश लाभले नाही.

नवी दिल्लीतील खाशाबा जाधव कुस्ती संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी सुनील कुमारने सुवर्ण, तर अर्जुनने ब्रॉंझ जिंकले होते. दुसऱ्या दिवशी आशू, आदित्य कुंडू तसेच हरदीपने ब्रॉंझ जिंकले. आशूने ६७ किलो, आदित्यने ७२ किलो तर हरदीपने ९७ किलो गटात हे यश मिळवले. आशू तसेच आदित्यचा ब्रॉंझ पदकाच्या लढतीत कस लागला नाही. हरदीपने प्रतिस्पर्ध्यास फारशी संधी दिली नाही.

आशूने सिरीयाच्या अब्दुलकरिमी मोहम्मद अल हसन याचा ८-१ असा पाडाव केला. त्यापेक्षाही आदित्यचा विजय जास्त समाधान देणारा होता. त्याने जपानच्या नाओ कुसाका याला दीड मिनिटातच ८-० असे नमवले. हरदीपने किर्गीजस्तानच्या प्रतिस्पर्ध्यास ३-१ असे हरवले. हरदीपचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. त्याने २०१६ च्या स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते.

आदित्य उपांत्य फेरीत इब्रागिम मागोमादोव याच्याविरुद्ध ०-९ असा पराजित झाला, तर आशूला उझबेकिस्तानच्या माखमूद बाशलॉगी याच्याविरुद्ध अखेरचा गुण गमावल्यामुळे उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. ग्यानेंदर (६० किलो) तसेच हरप्रीत (८२ किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत व्हावे लागले होते. ग्यानेंदरला रिपेचेजद्वारे संधी मिळाली होती. पण, तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT