Shafali Verma and Smriti Mandhana
Shafali Verma and Smriti Mandhana Twitter
क्रीडा

17 वर्षीय शफालीच धमाकेदार पदार्पण; स्मृतीनेही दाखवला तोरा!

सुशांत जाधव

India Women vs England Women Test Day 2 : इंग्लंड विरुद्ध रंगलेल्या कसोटी सामन्यातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या शफाली वर्माने दमदार सुरुवात केली. स्मृती मानधनासोबत डावाला सुरुवात करणाऱ्या शफालीने पदार्पणातील कसोटी सामन्यात नावाला साजेसा खेळ करत अर्धशतकी खेळी केली. खणखणीत चौकार खेचत 83 चेंडूत तिने कसोटी कारकिर्दीतील पहिले वहिले अर्धशतक पूर्ण केले. 17 वर्षीय शफालीने पहिल्या कसोटी सामन्यात लक्षवेधी खेळ करुन दाखवलाय. शफाली पाठोपाठ स्मृती मानधनाने अर्धशतक पूर्ण केले असून या दोघींनी शतकी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.

इंग्लंडच्या महिला संघाने 9 बाद 396 धावांवर आपला पहिला डाव घोषीत केला. भारताकडून पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या स्नेह राणाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. या फिरकीपटूला दिप्तीची साथ मिळाली. दिप्ती शर्माने 3 विकेट मिळवल्या. पूज वस्त्रारकर आणि भारतीय महिला संघाची प्रमुख गोलंदाज झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवल्या. इंग्लंडच्या महिला संघाणे टॉस जिंकून धावांचा डोंगर निश्चितच उभा केला आहे. पण भारतीय सलामी जोडीने ज्या तोऱ्यात सुरुवात केलीय ती लाजवाब अशीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT