india world cup 2023 campaign from today Rohit sharma ready to face five-time champions Australia sakal
क्रीडा

World Cup 2023 : भारताची वर्ल्डकप मोहीम आजपासून; पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यास रोहितची सेना सज्ज

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडूंनी भरलेली टीम विरुद्ध भारताची दर्जेदार खेळाडूंनी आणि स्थानिक वातावरणाने भारलेली टीम, असा हा मुकाबला

सुनंदन लेले

चेन्नई : विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाली असली तरी भारतीयांसाठी उद्या श्रीगणेशा होत आहे आणि सलामीलाच पाच वेळा अजिंक्यपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागणार आहे. खूप महत्त्वाच्या वार्षिक परीक्षेत पहिलाच पेपर गणिताचा असावा, असेच वातावरण उद्याच्या या सामन्यासाठी तयार झाले आहे.

नऊ साखळी सामने खेळायचे असताना पहिलाच सामना दोनही संघांसाठी अटीतटीचा असेल यात शंका नाही. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडूंनी भरलेली टीम विरुद्ध भारताची दर्जेदार खेळाडूंनी आणि स्थानिक वातावरणाने भारलेली टीम, असा हा मुकाबला असणार आहे. पहिल्या चार सामन्यांत मिळून जितके प्रेक्षक मैदानावर सामन्याचा आनंद घ्यायला हजर नसतील त्यापेक्षा जास्त प्रेक्षक चेपॉक मैदानावर चांगल्या क्रिकेटचा आनंद घ्यायला रविवारी चेन्नईच्या गरम वातावरणातही आनंदाने हजर राहतील.

कागदावर दोनही संघांचे बलाबल तगडे आहे. भारताकडे चांगल्या खेळाडूंच्या भरण्यासोबत स्थानिक वातावरणाचा अनुभव पाठीशी आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडे विश्वचषक स्पर्धेत योग्य वेळी चांगला खेळ कसा करायचा याचा अनुभव आणि विश्वास आहे. ऑस्ट्रेलियाची जमेची बाजू अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, तर भारताकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. चांगली खेळपट्टी आणि बाहेरचे वेगवान मैदान याच्या संगमाने भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्याला अजून रंग भरणार आहे.

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक सामन्याचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला मोठ्या स्पर्धेत चांगला खेळ करून पराभवाचा दणका दिलेला आहे. तीच क्षमता आताच्या ऑस्ट्रेलियन संघात आहे. फरक इतकाच आहे की आताच्या भारतीय संघातील खेळाडूंच्यात ‘आ रे’, ‘का रे’ करायची धमक गुणवत्ता आहे. ऑस्ट्रेलियन संघ अशी बात आहे की त्यांचा आक्रमक खेळाचा कांटा आक्रमक खेळाच्या काट्यानेच काढावा लागेल.

मार्कस स्टॉयनिस आजारी असल्याने खेळला नाही तरीही ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्शसारखे तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत. डेव्हीड वॉर्नर सारखा निम्मा भारतीय झालेला फलंदाज आहे आणि भारतीय संघाला हमखास त्रास देणारा चिवट स्टीव्ह स्मिथ आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्क आणि अ‍ॅडम झॅम्पा फलंदाजाला बाद करायला जाणारी जोडी आहे. थोडक्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करायचे झाल्यास सर्वोत्तम क्रिकेट १०० षटके खेळण्याचा एकमेव पर्याय भारतीय संघासमोर आहे.

शुभमन नाहीच

गेले तीन दिवस भारतीय संघाचा सराव बघताना स्पष्ट जाणवत आहे की, आपले खेळाडूही महत्त्वाच्या सामन्यासाठी एकदम सज्ज झाले आहेत. असे वाटते की भारतीय संघातील सर्वात चांगल्या फॉर्मात फलंदाजी करणारा शुभमन गिल आजारातून सावरला असला तरी थकावटीतून पुरेसा सावरला नसल्याने खेळणार नाही. गिल खेळला नाही तर ईशान किशनला मोठी संधी मिळेल. भारतीय संघ व्यवस्थापन बाकी फलंदाजांच्या क्रमवारीत उगाच बदल करायची शक्यता वाटत नाही.

तीन फिरकी गोलंदाज ?

गोलंदाजीत चेपॉक मैदानावरच्या खेळपट्टीचा स्वभाव बघता भारतीय संघ जडेजा, कुलदीप यादवसह अश्विनला खेळवेल असा अंदाज आहे. जडेजा जसा चेन्नई सुपर किंग्ज् करता खेळून स्थानक खेळाडू बनला आहे, तसाच अश्विन मूळचा चेन्नईचा असल्याच्या अनुभवाचा फायदा रोहित घेण्याची शक्यता दाट आहे.

अशी आहे खेळपट्टी

चेपॉक कर्मचाऱ्‍यांनी मैदान तयार करायला बरीच मेहनत घेतली आहे. अंतरंग आणि बाह्यांग दोनही सुंदर करताना कष्ट केलेले स्पष्ट दिसत आहेत. खेळपट्टीला गरम हवेपासून वाचवताना पाणी मारून भरपूर रोलींग केले गेले असल्याने एक दिवसीय सामन्यासाठी चांगली खेळपट्टी बनवली गेली आहे, असेच म्हणावे लागेल. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती दर्जेदार क्रिकेट सामन्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT