Bajrang Punia | Vinesh Phogat Sakal
क्रीडा

Vinesh Phogat: 'ही पोरगी जग जिंकेल, पण या देशाच्या सिस्टीमविरुद्ध...' विनेशच्या यशानंतर बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत

Bajrang Punia Post: भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी चौथं पदक पक्कं केल्यानंतर बजरंग पुनियाने तिचं कौतुक करण्याबरोबरच तिने गेल्या वर्षभरात बृजभूषण शरण सिंगविरुद्ध दिलेल्या लढ्याचीही आठवण करून दिली आहे.

Pranali Kodre

Bajrang Punia Post on Vinesh Phogat: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी चौथं पदक पक्कं करत इतिहास रचला. तिने महिलांच्या ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. यानंतर आता तिच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पण असं असतानाच भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने तिचं कौतुक करण्याबरोबरच तिने गेल्या वर्षभरात बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध दिलेल्या लढ्याचीही आठवण करून दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आहे.विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह काही भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग विरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याचसाठी अनेक दिवस कुस्तीपटूंनी आंदोलनही केले होते.

हे कुस्तीपटू या आंदोलनादरम्यान रस्त्यावरही उतरले होते. त्यावेळी त्यांच्यावर लाठीचार्जही करण्यात आल्याचे दिसले होते. या अंदोलनादरम्यान विनेश फोगटही आघाडीवर होती. या प्रकरणी नंतर न्यायालयात कुस्तीपटूंनी बृजभूषणविरुद्ध याचीकाही दाखल केली होती. यानंतर बृजभूषणवरील आरोपही दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं निश्चित केले होते.

दरम्यान, अद्यापही हे प्रकरण सुरू असून त्याचा अंतिम निकाल लागलेला नाही. अशात विनेश फोगटने आता ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित केल्यानंतर याबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

"ती जग जिंकेल, पण सिस्टीमविरुद्ध हरली होती..."

दरम्यान, विनेशच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील यशाबाबत बजरंग पुनियाने एक्सवर पोस्ट केली आहे की 'विनेश फोगाट भारताची ती वाघीण आहे, सलग दोन सामन्यात ४ वेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवलंय. त्यानंतर तिने माजी वर्ल्ड चॅम्पियनला हरवलंय.'

'पण एक गोष्ट सांगू. याच मुलीला स्वत:च्या देशात लाथा मारण्यात आल्या, तिला रस्त्यांवरून फरफडत नेण्यात आले. ही मुलगी जग जिंकणार आहे, पण या देशात सिस्टीमविरुद्ध हरली होती.'

विनेशची शानदार कामगिरी

ऑलिम्पिक खेळात विनेश महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरीत जाणारी पहिली भारतीय आहे. तिने मंगळवारी पहिल्या सामन्यात टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई सुसाकीविरुद्ध ३-२ अशा फरकाने विजय मिळवला होता.

त्यानंतर तिने युक्रेनच्या ओक्साना लिव्हाच विरुद्ध ७-५ अशा विजय मिळवला, तर उपांत्य सामन्यात तिने क्युबाच्या लोपेझ युस्नीलीस गुझमनविरुद्ध ५-० असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ती बुधवारी रात्री सुवर्णपदकासाठी खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor Martyrs: देशासाठी प्राणार्पण... ऑपरेशन सिंदूरमधील 'त्या' सहा शूरवीरांची ओळख अखेर उघड

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Army Jawan Success : जिद्द असावी तर अशी! निवृत्तीनंतर साताऱ्याच्या माजी सैनिकानं एकाच वर्षात 'क्रॅक' केल्या तब्बल 12 सरकारी परीक्षा; एकामागून एक कशा दिल्या Exam?

SCROLL FOR NEXT