India Chess Team  Sakal
क्रीडा

भारतीय बुद्धिबळपटूंची स्वप्नपूर्ती Chess Olympiad मधील सुवर्ण कामगिरीनंतर खेळाडूंचा आनंद गगनात मावेना, वाचा काय म्हणाले

Indian Chess Players opened up on Gold Medal in Olympiad: बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर भारतीय खेळाडूंनी यशाचे श्रेय सांघिक खेळाला देतानाच स्वप्नपूर्ती झाल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.

सकाळ वृत्तसेवा

India Gold Medal Victory in Chess Olympiad 2024: भारताच्या पुरुष व महिला संघाने बुडापेस्टमध्ये रविवारी इतिहास रचला. भारताच्या दोन्ही संघाने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालताना संस्मरणीय कामगिरी केली. देदीप्यमान यशानंतर भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला. या यशाचे श्रेय त्यांनी सांघिक खेळाला देतानाच स्वप्नपूर्ती झाल्याच्या भावनाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या.

भारतीय पुरुष संघाच्या अजिंक्यपदाचा शिल्पकार डी. गुकेश याप्रसंगी म्हणाला, या स्पर्धेमध्ये आम्हाला छान खेळ करता आला. वैयक्तिक तसेच सांघिक अशा दोन्ही बाजूने मी आनंदी आहे. खरेतर हे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच आहे.

अर्जुन इरीगेसी याने या वेळी नमूद केले की, डी. गुकेश हा पहिल्या बोर्डवर चांगला खेळ करू शकेल, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्याची पहिल्या बोर्डसाठी निवड करण्यात आली. माझी तिसऱ्या बोर्डसाठी निवड करण्यात आली. हा योजनेचा एक भाग होता. यामुळे पश्‍चात्ताप करण्यासारखे काही नाही.

अखेरच्या लढतीआधी उत्साह

डी. गुकेश याने सांगितले की, अखेरच्या लढतीत आमची बैठक पार पडली. त्या वेळी आम्ही जल्लोष करण्याच्या मूडमध्ये होतो. या लढतीत पराभूत झालो असतो तरी टायब्रेकमध्ये आम्हाला विजय मिळाला असता असे मला वाटत होते; मात्र तरीही आम्ही विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनच उतरलो. अखेर मी व अर्जुनने विजय मिळवला आणि भारताला सुवर्णपदक मिळाले.

व्यावसायिक खेळाडू

भारतीय संघाचे कर्णधार एन. श्रीनाथ यांनी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, भारतीय खेळाडू हे व्यावसायिक आहेत. त्यामुळे या सर्व खेळाडूंना माझ्या सल्ल्याची गरज नाही. बुद्धिबळाच्या पटावर काय करायचे हे त्यांना माहीत आहे. फक्त त्यांना एकत्रित आणायचे होते. त्यांना खेळताना बघायला आवडले.

२० वर्षांनंतर स्वप्नपूर्ती

याप्रसंगी भारताची अनुभवी महिला खेळाडू हरिका द्रोणावल्ली हिने तब्बल २० वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.

हरिका द्रोणावल्ली पुढे म्हणाली की, बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये आमची कामगिरी समाधानकारक होती; मात्र या सुवर्णपदकाने मी हे विसरले आहे. या संघातील युवा खेळाडूंनी खरोखरच कौतुकास्पद कामगिरी केली. निराशेला मागे टाकत आम्ही झोकात पुनरागमन केले.

देशासाठी सर्वस्व पणाला

महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदकही पटकावले. याप्रसंगी तिने सलग ११ सामने खेळताना लागणाऱ्या कौशल्याबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, करो या मरो अशीच परिस्थिती होती; पण देशासाठी सर्वस्व पणाला लावून खेळ केला. भारतीय संघाच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. सुवर्णपदक पटकावल्याचा आनंद काही औरच आहे.

प्रशिक्षकांकडून कौतुक

भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा अभिजित कुंटे यांच्याकडे होती. त्यांनी भारतीय महिला खेळाडूंचे कौतुक केले. ते म्हणाले, अखेरच्या दोन फेऱ्या महत्त्वपूर्ण होत्या. दिव्या देशमुख व वंतिका अग्रवाल या दोन्ही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. वैशालीला काही वेळा धक्के बसले; पण हरिका हिने लय मिळवली. तानियाकडून चांगली सुरुवात मिळाली.

ऑलिंपियाडमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी

  • खुला सांघिक विभाग - सुवर्णपदक

  • महिला सांघिक - सुवर्णपदक

  • पुरुष (पहिला बोर्ड) - सुवर्णपदक (डी. गुकेश)

  • पुरुष (तिसरा बोर्ड) - सुवर्णपदक (अर्जुन एरीगेसी)

  • महिला (तिसरा बोर्ड) - सुवर्णपदक (दिव्या देशमुख)

  • महिला (चौथा बोर्ड) - सुवर्णपदक (वंतिका अग्रवाल)

खुल्या सांघिक विभागातील सर्वोत्तम तीन

  • १) भारत

  • २) अमेरिका

  • ३) उझ्बेकिस्तान

महिला सांघिक विभागातील सर्वोत्तम तीन

  • १) भारत

  • २) कझाकस्तान

  • ३) अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT