Sourav Ganguly
Sourav Ganguly 
क्रीडा

फुटबॉल प्रेमापोटी दादा निघाला मॉस्कोला

सुनंदन लेले

लंडन : सौरव गांगुलीचे फुटबॉल प्रेम सगळ्यांना माहीत आहे. ‘‘मी अस्सल बंगाली माणूस असल्याने क्रिकेट इतकेच मला फुटबॉल आवडते. जरा मजेदार प्रवास त्याच प्रेमापोटी मी करणार आहे, असे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांगितले.

लॉर्डसचा सामना संपल्यावर मी थेट मॉस्कोला जाणार्‍या विमानात बसणार आहे. होय वर्ल्डकप फुटबॉल अंतिम सामना बघायला मी मॉस्कोला माझी पत्नी डोना आणि मुलगी सना बरोबर जातो आहे. अंतिम सामना बघून परत विमानात बसणार सोमवारी आणि मंगळवारी लंडनला येऊन कारने लिड्सला येणार आहे. शेवटच्या एक दिवसीय सामन्याकरता. मजा येणार आहे अंतिम सामन्याला मी जाम उत्साहात आहे. मॉस्कोला जायला’’, असे सौरवने सांगितले.

आम्ही बदल करणार नाही 
यंदाच्या वर्षी एकाच दिवशी वर्ल्डकप फुटबॉलचा अंतिम सामना आणि विम्बल्डनचा अंतिम सामना होतो आहे. जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा खेळ सामना म्हणून वर्ल्डकप फुटबॉल अंतिम सामन्याकडे बघितले जाते. विम्बल्डन संयोजकांना मात्र आपली स्पर्धा प्रिय आहे. काहीही झाले तरी ते वेळापत्रकात बदल करणार नाहीयेत. इंग्लंडला स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजता वर्ल्डकप फुटबॉल अंतिम सामना होणार आहे आणि पुरुष एकेरीचा विम्बल्डनचा अंतिम सामना दुपारी 2 वाजता चालू करायची परंपरा आहे. संयोजक तीच परंपरा कसेही करून पाळणार आहेत. इतकेच काय पुढील वर्षी ज्या दिवशी पुरुष एकेरीचा अंतिम सामना होणार आहे त्याच दिवशी क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे. विम्बल्डन संयोजकांना त्याची चिंता नाहीये कारण ते आपल्या ठरल्या वेळेलाच आपला सामना चालू करायच्या निर्धारात आहेत. जग बदलूदेत आम्ही बदलणार नाही असाच त्यांचा सरळ साधा विचार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT