भारताचा मनवीर सिंग मालदीव गोलरक्षकास चकवण्याचा प्रयत्न करताना
भारताचा मनवीर सिंग मालदीव गोलरक्षकास चकवण्याचा प्रयत्न करताना 
क्रीडा

कुमार फुटबॉल संघाचे मालदीवविरुद्ध चार गोल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय कुमार संघाने दक्षिण आशियाई 18 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील धडाका कायम राखताना मालदीवचा 4-0 असा पराभव केला. काठमांडूतील ही लढत जिंकत भारताने अंतिम फेरी गाठण्याची औपचारिकता सहज पूर्ण केली.

नरेंदर गहलोत, मानवीर सिंग, निंथोईनगांना मीताई यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताचा विजय सुकर केला, तर पूर्वार्ध संपण्याच्या सुमारास आहनाफ राशीद याच्याकडून स्वयंगोल झाल्यामुळे भारताकडे विश्रांतीस 2-0 आघाडी होती.

सातव्या मिनिटास भारताने आघाडी घेतल्याने मालदीव हादरले, पण त्यातून सावरल्यावर त्यांनी चांगली प्रतिआक्रमणे केली होती. अर्थात त्यानंतरही भारतीयांनी दोन्ही बगलातून चाली करीत मालदीववरील दडपण कधीही कमी होऊ दिले नाही. आता स्पर्धेतील अंतिम फेरीत भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी बांगलादेशविरुद्ध रविवारी होईल.

पूर्वार्धातील दोन गोलच्या आघाडीमुळे भारताने उत्तरार्धात बचाव जास्त भक्कम केला. अर्थात त्यानंतरही मधल्या फळीच्या साथीत भारतीय आक्रमकांकडेच सूत्रे होती. उत्तरार्धाच्या मध्यास भारतीय खेळात काहीसे शैथिल्य आले होते, त्याचा फायदा घेत मालदीवने चांगली आक्रमणे रचली. भारतीय बचावाचा कस लागला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या भारतीयांनी आक्रमणाचा धडाका सुरू करीत चौथा गोल करीत मालदीवच्या प्रतिकाराच्या आशाच संपवल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT