Women Cricket Team Sakal
क्रीडा

IND VS SL Asia Cup : भारतीय महिलांची आज विजेतेपदाची सप्तपदी?

आशिया करंडक क्रिकेट ; सातवे अजिंक्यपद आवाक्यात

सकाळ वृत्तसेवा

सिल्हेट : साखळी सामन्यात पाकविरुद्ध पराभवाचा धक्का बसला असला तरी ताकदवान खेळ करणाऱ्या भारतीय महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सातवे अजिंक्यपद मिळवण्यास सज्ज झाल्या आहेत. उद्या श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना होत आहे. याच श्रीलंकेला सलामीच्या सामन्यात पराभूत करून भारतीय महिलांनी स्पर्धेतील आपली मोहीम सुरू केली होती.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या संघातील हुकमी फलंदाजांनी फारशा धावा केलेल्या नसल्या तरी नवोदितांनी ही जबाबदारी पार पाडत भारताचे वर्चस्व कायम ठेवले आहे. स्पर्धेअगोदर शेफाली वर्माच्या फॉर्मबाबत चर्चा होत होती; परंतु तिने प्रभावी कामगिरी करत १६१ धावा आणि तीन विकेट असे योगदान दिले आहे. सर्वात शानदार खेळ जेमिमा रॉड्रिग्जने २१५ धावा फटकावून केली आहे. त्यानंतर दीप्ती शर्माने ९४ धावा आणि १३ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. उद्याच्या अंतिम सामन्यात प्रामुख्याने या तिघींकडून सातत्य राखण्याची अपेक्षा आहे.

कागदावरही भारताचा संघ श्रीलंकेपेक्षा वरचढ आहे. त्यांच्या ओशादी रनसिंघे हिलाच १०० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने धावा करता आल्या आहेत.

सावध राहावे लागेल

सिल्हेट स्टेडियमची खेळपट्टी अतिशय संथ आहे. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेने सुरुवातीपासून भारतीयांविरुद्ध फिरकी आक्रमण सुरू करून मानधना आणि शेफाली यांच्यासमोर अडथळे निर्माण केले होते, पण जेमिमाने शानदार अर्धशतक करून संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली होती. उद्याचेही चित्र वेगळे नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT