cricket
cricket 
क्रीडा

INDvsNZ : भारतीय गोलंदाज 'सुपर' अन् न्यूझीलंड फलंदाज 'फ्लॉप'

सुनंदन लेले

ऑकलंड : पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून सामना जिंकण्यात अपयश आलेले असूनही न्युझिलंड संघाने दुसर्‍या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. फलंदाजीला खूप पोषक नसणार्‍या खेळपट्टीवर न्युझिलंडच्या मुख्य फलंदाजांना बाद करण्यात यश आल्याने धावफलकाला अपेक्षित बाळसे चढले नाही. जडेजाने 4 षटकात 18 धावा देत दोन फलंदाजांना बाद केल्याने 20 षटकात न्युझिलंडला 5 बाद 132चा टप्पा गाठता आला. याचाच अर्थ असा की 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 आघाडी घेण्याची नामी संधी भारतीय संघाला आहे.

कर्णधार कोहलीने नवा चेंडू शार्दूल ठाकूरला दिला आणि मार्टीन गुप्टीलने दोन षटकार ठोकून त्याचे स्वागत केले. ईडन पार्कच्या खेळपट्टीवर चेंडू काहीसा उडत होता तसेच थांबून येत होता ज्याने पाय पुढे टाकून फटके मारणे जमत नव्हते. खेळपट्टीचा अंदाज आल्यावर गुप्टील आणि कॉलीन मुन्रोने मागे रेलत मोठे फटके मारले. 48 धावांची सलामीची भागीदारी शार्दूल ठाकूरने तोडली जेव्हा गुप्टीलचा प्रचंड उंच उडालेला झेल कोहलीने पकडला. लगोलग शिवम दुबेने जम बसवलेल्या मुन्रोला बाद केले तेव्हा झेल विराट कोहलीनेच पकडला.

टप्पा पडल्यावर चेंडू थांबून येण्याचा झटका कॉलीन ग्रंथोमला बसला जेव्हा तो रवींद्र जडेजाला लगेच बाद झाला. इतकेच नाही तर कप्तान विल्यमसन जडेजाला लगेच बाद झाला. 4 मुख्य फलंदाज बाद झाल्यावर धावगतीला चांगलाच आळा बसला. 15 षटकांच्या खेळानंतर धावफलकावर फक्त 94 धावा दिसत होत्या. अनुभवी रॉस टेलरच्या साथीला तरुण आक्रमक फलंदाज सिफर्ट आला. सिफर्टने त्याच्या गुणवत्तेची झलक चहलला समोर षटकार मारून दिली. दरम्यान जडेजाने आपल्या 4 षटकात फक्त 18 धावा दिल्या.

विराट कोहलीने विचारपूर्वक बुमराची दोन षटके राखून ठेवली होती. शेवटच्या हाणामारीच्या षटकात रॉस टेलरचा सोपा झेल विराट कोहलीने सोडला आणि लाजेने तोंड दोन हातात लपवले. बुमरा - शमीच्या जोडीने चेंडू स्वींग करून शेवटच्या 3 षटकात फलंदाजांना मोठे फटके मारून दिले नाहीत. बुमराने 4 षटकात 21 आणि शमीने 4 षटकात 22 धावा दिल्या. अखेर 20वे षटक संपले असता फलकावर 131 धावाच लागल्या होत्या. खेळपट्टीचा अंदाज घेऊन एकेरी दुहेरी धावांवर लक्ष ठेवले तरी भारताला दुसरा टी20 सामना जिंकणे अशक्य नाहीये असेच म्हणावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT