INDW vs PAKW LIVE Streaming
INDW vs PAKW LIVE Streaming 
क्रीडा

INDW vs PAKW LIVE Streaming: आज महामुकाबला; जाणून घ्या सामना कधी, कुठे आणि कसा पहायचा

सकाळ डिजिटल टीम

आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपला 10 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. यंदा दक्षिण आफ्रिकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज भारताची पहिली लढल पाकिस्तानसोबत होणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवण्याचा मौका भारताकडे असणार आहे.(INDW vs PAKW LIVE Streaming )

आज १२ फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान महिला क्रिकेट संघांमध्ये ग्रुप स्टेज सामना रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंड मध्ये होणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल.

2022 मध्ये ही स्पर्धा खेळली गेली तेव्हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताला यजमान ऑस्ट्रेलियासमोर पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा स्थितीत उपविजेत्या भारताला भूतकाळातील चुका सुधारण्याची संधी असेल.

कुठे पाहाल सामना?

भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याचबरोबर हा सामना डिझनी+हॉटस्टारवर देखील लाईव्ह पाहता येतील.

तसेच, टी व्हीवर सोनी स्‍पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येईल. यासोबतच, मोबाइलवर सोनी लिव अॅपद्वारेदेखील लाईव्ह सामना पाहू शकता.

भारताचा टी 20 महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्‍वरी गायकवाड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT