Australian players DC Instagram
क्रीडा

ऑसी मालदीवला पोहचले, हसी-बालाजी एअर अ‍ॅम्बुलन्समधून चेन्नईला

खेळाडूंना ऑस्ट्रेलियन सीमेवरील प्रवासाचे निर्बंध हटण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2021 : आयपीएलच्या 14 व्या हंगामात खेळण्यासाठी भारतात आलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू (Australian players) व्हाया मालदीव (Maldives) मायदेशी परतणार आहेत. ज्या खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत ते सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू, स्टाफ मेंबर्स, कॉमेंट्री पॅनलमधील सदस्य मालदीवला रवाना झाले आहेत. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह (Covid 19 Positive) आलेले चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) बॅटिंग कोच माइक हसी (Michael Hussey) भारतातच निरीक्षणाखाली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) गुरुवारी एका निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीये. मालदीवमध्ये खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या सीमेवरील निर्बंध हटण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. 15 मे पर्यंत कोणत्याही व्यक्तीला भारतातून ऑस्ट्रेलियात जाण्यास बंदी आहे.

खेळाडू, कोच, मॅच ऑफिशियल्स आणि कॉमेंट्री पॅनलमधील सदस्यांना भारतातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येत आहे. जोपर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत तोपर्यंत हे सर्व खेळाडू मालदीवमध्ये वास्तव्य करतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशन (ACA) यांनी म्हटले आहे. 3 खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर 40 ऑस्ट्रेलियन आयपीएल स्पर्धेशी जोडले गेले होते. यात 14 खेळाडूंचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बीसीसीआयने अवघ्या दोन दिवसांत खेळाडूंना मालदीवमध्ये सोडण्याची व्यवस्था केली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन यांनी बीसीसीआयचे अभार मानले आहेत. माइक हसी CSK च्या ताफ्यासोबत असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. ते यातून रिकव्हर होऊन लवकर मायदेशी परततील, असा विश्वासही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने व्यक्त केलाय.

वरुण चक्रवर्ती, संदीप वारियर, वृद्धिमान साहा आणि अमित मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली होती. हे खेळाडू इतर खेळाडूंच्या संपर्कात आले असल्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने मंगळवारी तातडीची बैठक बोलवून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

हसी आणि बालाजी एअर अ‍ॅम्बुलन्समधून चेन्नईला

चेन्नई सुपर किंग्जचे बॅटिंग कोच माइक हसी आणि बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांना एअर अ‍ॅम्बुलन्समधून दिल्लीहून चेन्नईला नेण्यात आले. फ्रेंचायझी संघाने यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंहने सर्व खेळाडू घरी निघल्यानंतर सर्वात शेवटी हॉटेल सोडणार असल्याची माहिती समोर आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT