IPL 2024 Venue  esakal
क्रीडा

IPL 2024 Venue : आयपीएल 2024 च्या ठिकाणांबाबत उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे मोठे वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Venue : बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी इनसाईड स्पोर्ट्सला मुलाखत दिली. यात त्यांनी आयपीएल 2024 च्या ठिकाणांबाबत महत्वाची अपडेट दिली. राजीव शुक्ला यांनी सांगितले की आयपीएल 2024 च्या हंगामातील सामन्यांची ठिकाणे अजून निश्चित झालेली नाहीत. आम्ही अजूनही भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे.

राजीव शुक्ला म्हणाले की, 'आयपीएल शिफ्ट करायची की नाही याबाबत आमची भारत सरकार आणि गृह मंत्रालयांसोबत चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतरच निश्चित असा निर्णय घेता येईल.' राजीव शुक्ला यांनी वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा ही बंगळुरू आणि दिल्लीत होणार असल्याचं सांगितलं.

ते म्हणाले की, 'आयपीएल आणि वुमन्स प्रीमियर लीगची तयारी सुरू आहे. वुमन्स प्रीमियर लीगचे अर्धे सामने हे बंगळुरू येथे होणार आहेत. तर उर्वरित सामने हे दिल्लीत होतील.

जगातील सर्वात मोठी टी 20 लीग स्पर्धा ही 22 मार्चला सुरू होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान भारतात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळेच बीसीसीआय यंदाची आयपीएल भारताबाहेर आयोजित करण्याचं प्लॅनिंग करत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT