IPL Tournament  Auction
IPL Tournament Auction  
क्रीडा

IPL लिलावासाठी पाच शहरांची निवड

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लीलावासाठी पाच शहरांची यादी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) जाहीर करण्यात आली. या वर्षी खेळाडूंचा लिलाव छोट्या स्वरूपात होणार असून त्यासाठी इस्तंबूल, बंगळूर, मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद या पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या १६ तारखेला खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

या बद्दल अधिक माहिती देताना बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले की, ‘पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावासाठी जरी पाच शहरांची निवड करण्यात आली असली, तरी अरुण सिंह धुमल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आयपीएलच्या नवीन कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर अंतिम ठिकाण निश्चित केले जाणार आहे.

आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या १० संघाना १५ नोव्हेंबरपर्यंत कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील, याची यादी बीसीसीआयकडे द्यायची असून या वेळी प्रत्येक संघासाठी सॅलरी कॅप (मानधन मर्यादा) ९५ कोटी ठरवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT