jammu kashmir umran malik india debut india vs ireland match
jammu kashmir umran malik india debut india vs ireland match 
क्रीडा

IND vs IRE: टीम इंडियामध्ये 'जम्मू एक्सप्रेस'ची एन्ट्री; आयर्लंडविरुद्ध पदार्पण

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने सर्वांना वेड लावणारा जम्मू-काश्मीरचा उमरान मलिक टीम इंडियासाठी पदार्पण झाली आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात उमरान मलिकचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने उमरान मलिकला पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या. (ipl star jammu kashmir umran malik india debut india vs ireland match)

बीसीसीआयने आयर्लंडविरुद्ध टी-20 सामना सुरू होण्यापूर्वी ट्विट करून हे माहिती दिली. ट्विट करून लिहिले की, एक स्वप्न पूर्ण झाले आहे. उमरान मलिकने टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. उमरान मलिकला टीम इंडियासाठी टी-20 मध्ये कॅप क्रमांक-98 मिळाला आहे. टीम इंडियाचा सीनियर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने उमरान मलिकला कॅप दिली.

उमरान मलिकने इंडियन प्रीमियर लीग-2022 मध्ये आपल्या जबरदस्त कामगिरीने संपूर्ण क्रिकेट जगताला चकित केले. उमरान मलिकने सातत्याने 150 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली, आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याच्या बाबतीत त्याचे नाव टॉप-3 मध्ये समाविष्ट झाले आहे. उमरान मलिकने आयपीएल सामन्यादरम्यान 157 किमी प्रति तासाच्या वेगाने चेंडू टाकला आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यांत 22 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT