Arshdeep Singh IPL 2023
Arshdeep Singh IPL 2023 
IPL

IPL 2023: अर्शदीप सिंगचे दोन चेंडू अन् BCCIला बसला 30 लाखांचा फटका

Kiran Mahanavar

Arshdeep Singh IPL 2023 : पंजाब किंग्जने शनिवारी मुंबई इंडियन्सचा 14 धावांनी पराभव करून मोसमातील चौथा विजय नोंदवला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने तुफानी फलंदाजी करताना 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान संघ मुंबई इंडियन्सला केवळ 201 धावा करता आल्या. या सामन्यात अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली पण त्याच्या दोन चेंडूंवर बीसीसीआयला 30 लाख रुपये मोजावे लागले.

अर्शदीप सिंगने चार षटकांच्या स्पेलमध्ये 20 धावा देत चार विकेट घेतल्या. यातील शेवटच्या षटकात त्याने दोन विकेट घेतल्या. त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर टिळक वर्माला बाद केले. चेंडू थेट मधल्या स्टंपला लागला आणि स्टंप मध्येच तुटला. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने नेहल वढेरालाही त्याच पद्धतीने बाद केले आणि पुन्हा एकदा स्टंप मध्येच तुटला.

अर्शदीपच्या या दोन चेंडूंवर बीसीसीआयला 30 लाख रुपये मोजावे लागले आहे. वास्तविक एलईडी स्टंप आणि जिंग बेल्सच्या सेटची किंमत 30 लाख रुपये आहे. अर्शदीप सिंगने दोन स्टंप तोडल्यामुळे बीसीसीआयला सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. अर्शदीप सिंगला शेवटच्या षटकात 15 धावांचा बचाव करायचा होता. त्याने अवघ्या 2 धावा देत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा विजय बीसीसीआयला महागात पडला.

या सामन्यात अर्शदीपशिवाय पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करणने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने 29 चेंडूत 55 धावा केल्या ज्यात त्याने चार षटकार आणि पाच चौकार लगावले. धवनच्या अनुपस्थितीत सॅम करणने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह पंजाब आता पाचव्या स्थानावर गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT