IPL 2024 Impact Player Rule
IPL 2024 Impact Player Rule esakal
IPL

IPL 2024 : रोहित अन् बुमराहनं टीका करताच बीसीसीआय आपल्या 'त्या' निर्णयाचा करणार पुनर्विचार

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Impact Player Rule : आयपीएलमध्ये जेव्हाबासून इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आला आहे तेव्हापासून 200 धावांचं टार्गेट देखील प्रतिस्पर्धी संघ आरामात चेस करताना दिसून येत आहे. या नियमावर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली होती.

आता बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम गेल्या हंगामात लागू करण्यात आला होता. या नियमानुसार संघांना सामना सुरू असताना आपल्या संघात एक बदली खेळाडू खेळवण्याची मुभा देण्यात आली होती.

रोहितने घेतली उघड भुमिका

रोहित शर्माने इम्पॅक्ट प्लेअरचा अष्टपैलू खेळाडूंवर नकारात्मक इम्पॅक्ट पडेल अशी भीती व्यक्त केली होती. त्याने एका मुलाखतीत इम्पॅक्ट प्लेअर नियमावर बोलताना आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, इम्पॅक्ट प्लेअर नियम हा योग्य आहे असं मला वाटत नाही. क्रिकेट हा 11 खेळाडूंनी खेळला जातो 12 खेळाडूंनी नाही.

त्यानं शिवम दुबेचं उदाहरण दिलं अन् म्हणाला की शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळं गोलंदाजी करण्याची गरजच उरलेली नाही. यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या विकासावर मोठा परिणाम होईल.

बीसीसीआय चर्चेसाठी तयार : अरूण धुमल

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहच्या वक्तव्यानंतर बीसीसीआय दबावात आली आहे. या दोघांनी उघड उघड भुमिका घेतल्यानं बीसीसीआयला स्पष्टीकरण द्यावं लागलं. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील चेअरमन अरूण धुमल यांनी या दोघांच्या वक्तव्याची दखल घेतली.

द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 'आम्ही नक्कीच याचा पुनर्विचार करून आम्ही चर्चेसाठी कायम तयार आहोत.' बीसीसीआयच्या या भुमिकेवरून ते या नियमाचा पुनर्विचार करण्यास तयार आहेत. ते नियम रद्द करतील किंवा त्यात बदल करण्याची शक्यता आहे.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT