IPL

IPL Final 2023: फॅन्ससाठी BCCI घेतला मोठा निर्णय! जुन्या तिकिटांसह 'रिझर्व्ह डे'ला सामना बघता येणार फक्त...

Kiran Mahanavar

CSK vs GT IPL Final 2023 : पावसाच्या व्यत्ययामुळे आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना आता राखीव दिवशी म्हणजेच 29 मे रोजी खेळल्या जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता.

अहमदाबादमध्ये सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे कट ऑफ वेळेपर्यंत पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी आता सामना 29 मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही महत्त्वाची नोटीस बजावण्यात आली आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर प्रेक्षकांना त्यांची प्रत्यक्ष तिकिटे सुरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून ते सामना पाहण्यासाठी उद्या म्हणजेच 29 मे रोजी स्टेडियमवर पोहोचेल तेव्हा त्यांना या तिकिटाद्वारे प्रवेश करता येईल.

चाहत्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी मानली जाऊ शकते कारण रविवार असल्याने अनेक चाहते सामना पाहण्यासाठी आले होते. अशा परिस्थितीत आता दुसऱ्या दिवशी पुन्हा स्टेडियमवर येण्यासाठी त्याला तेच तिकीट सुरक्षित ठेवावे लागणार आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्याचे तिकीट पूर्णपणे विकले गेले होते. या सामन्यात चाहत्यांसह खेळाडूंनीही बराच वेळ सामना सुरू होण्याची वाट पाहिली. मात्र 11 वाजण्याच्या सुमारास पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी चर्चा करून सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना राखीव दिवशी खेळल्या जाणार आहे. आता चेन्नई आणि गुजरात यांच्यातील विजेतेपदाचा सामना 29 मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT