Rishabh Pant Sakal
IPL

IPL 2024: दिल्लीच्या पहिल्या विजयानंतरही पंतला धक्का! CSK विरुद्धच्या सामन्यानंतर झाली मोठी कारवाई

Delhi Capitals captain Rishabh Pant fined: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या विजयानंतरही दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals captain Rishabh Pant fined: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रविवारी (31 मार्च) 13 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी विजय मिळवला. हा दिल्लीचा या हंगामातील पहिलाच विजय आहे.

मात्र या विजयानंतरही दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावर 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे .

आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गतीबाबतच्या नियमाचा भंग करण्याची ही दिल्ली कॅपिटल्सची पहिलीच वेळ आहे. त्याचमुळे यावेळी कर्णधार पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्याच आला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या 17 व्या हंगामात अशी कारवाई होणारा पंत पहिलाच कर्णधार नाही, तर यापूर्वीही गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलवरही ही कारवाई झाली आहे.

नियमानुसार षटकांची गती कमी राखल्याची चूक संघाकडून पहिल्यांदा झाल्यास संघाच्या कर्णधारावर 12 लाखांचा दंड आकारला जातो. तसेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर 24 लाखांचा आणि संघातील इतर खेळाडूंवरही 6 लाख किंवा सामना शुल्कातील 25 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.

त्याचबरोबर तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखांच्या दंडाबरोबरच एका सामन्याची बंदीही घातली जाते. तसेच संघातील इतर खेळाडूंवरही 12 लाख किंवा सामना शुल्कातील 50 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.

दिल्लीचा विजय

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 191 धावा केल्या होत्या. त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 6 बाद 171 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT