Delhi Capitals who Hit by COVID 19 Beat Punjab Kings
Delhi Capitals who Hit by COVID 19 Beat Punjab Kings esakal
IPL

DC vs PBKS : दिल्लीचे कोरोनासमोर 'मैं झुकेगा नही!'

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) सामना होणार की नाही? दिल्लीचे किती खेळाडू कोरोनामुळे मुकणार? दिल्ली पूर्ण ताकदीनिशी खेळू शकणार का? असे अनेक प्रश्न सामना सुरू होण्यापूर्वी उपस्थित झाले होते. मात्र दिल्लीने या सर्व प्रश्नांना आपल्या कामगिरीतून उत्तर दिले. त्यांनी पंजाबवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. पंजाब किंग्जचे 116 धावांचे आव्हान पार करताना दिल्लीने धडाक्यात सुरुवात केली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आक्रमक अर्धशतक (57) ठोकले. त्याला दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 20 चेंडूत 41 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 81 धावांपर्यंत मजल मारून दिली.

आयपीएलच्या 32 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स अखेर मैदानात उतरला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनिश्चिततेच्या गर्तेतून बाहेर येत दिल्लीच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडायला सुरूवात केली.

दिल्लीच्या फिरकीपटूंनी पंजाबचे एका पाठोपाठ एक फलंदाज पॅव्हेलिनयमध्ये धाडण्यास सुरुवात केली. ललित यादव आणि अक्षर पटेलने पंजाबला हादरा दिला. त्यानंतर खलील अहमद आणि मुस्तफिजूर रहीमने देखील त्यांना हातभार लावत पंजाबची अवस्था 5 बाद 85 धावा अशी केली. दरम्यान, पंजाबची मधली फळी डाव सावरेल असे वाटत असतानाच कुलदीप यादवने एकाच षटकात दोन विकेट घेत पंजाबचे कंबरडे मोडले. त्यानंतर राहुल चहरने 12 धावा करत पंजाबची शंभरी पार करून दिली. अखेर पंजाबचा डाव 20 षटकात 115 धावात संपुष्टात आला.

पंजाबकडून फक्त मयांक अग्रवाल (24), जितेश शर्मा (32), शाहरूख खान (12) आणि राहुल चाहरने (12) दुहेरी आकडा पार केला. जितेश शर्मा आणि शाहरूख खानने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोक्याच्या वेळी दिल्लीने त्यांना बाद करत सामन्यावर नियंत्रण मिळवले. दिल्लीकडून खलील अहमद, ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT