Gautam Gambhir Vs Virat Kohli IPL 2023
Gautam Gambhir Vs Virat Kohli IPL 2023  esakal
IPL

Gautam Gambhir IPL 2023 : कोहली - कोहली काही गंभीरची पाठ सोडेना, संबंध नसतानाही विराट चाहत्यांना डिवचले

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir Vs Virat Kohli IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामात सध्या चर्चा फक्त दोघांची सुरू आहे. एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरा म्हणजे गौतम गंभीर! आरसीबी आणि लखनौ यांच्यात 1 मे रोजी झालेल्या सामन्यात हे भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू एकमेकांना भिडले. यावर क्रिकेट वर्तुळातून अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. दोन दिवसात हे प्रकरण शांत होईल असे वाटले होते. मात्र या भांडणाच्या नव्या नव्या अवृत्या समोर येत आहेत.

आरसीबीकडून पराभव स्विकारल्यानंतर 3 मे रोजी लखनौचा सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत झाला. जरी सामना लखनौ आणि चेन्नईचा असला तरी या सामन्याला देखील विराट - गंभीर वादाची किनार लाभलीच. या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांना पुन्हा एकदा गौतम गंभीरला डिवचले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममधील असल्याचे सांगितले जात आहे. 3 मे रोजी लखनौ आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्सने 19.2 षटकात 7 बाद 125 धावा केल्या होत्या. मात्र पावसाने खेळात व्यत्यय आणला अन् सामना रद्द करावा लागला. दरम्यान, लखनौचा मेंटॉर गौतम गंभीर अमित मिश्रा आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासोबत पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराटच्या चाहत्यांनी प्रेक्षक गृहातून विराट - विराट असे ओरडण्यास सुरूवात केली.

मग काय शिघ्रकोपी गौतम गंभीरचा पारा लगेच चढला. गंभीर पायऱ्या चढता चढता थांबला आणि प्रेक्षकांकडे रागाने पाहू लागला. हा व्हिडिओ लांबून शूट करण्यात आला. मात्र तरी देखील गौतम गंभीरनेची रागात असलेली देहबोली स्पष्ट दिसत होती. जर हे आगाऊ विराट चाहते जर जवळ असते तर नक्कीच गौतम गंभीर अजून आक्रमक झाला असता आन् प्रकरणही चांगलेच तापले असते.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT