Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

घाटकोपरमध्ये कोसळलेल्या बेकायदा होर्डिंगच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, यावरुन राजकारण सुरु झालं आहे.
Bhujbal
Bhujbal esakal

मुंबई : मुंबईत वादळी वाऱ्यामुळे सोमवारी (ता.१३) उडालेल्या हाहा:कारामध्ये घाटकोपर येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला बेकायदा लावलेले होर्डिंग कोसळले, त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून राजकारण सुरू झाले आहे. यात भाजपने शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोषी धरले आहे.

मात्र राज्यात मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या प्रकरणात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची बाजू घेत या प्रकरणात त्यांचा काय संबंध? असा सवाल करीत सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Chhagan Bhujabal raised question to his govt what is Uddahv Thackeray connection with collapsed hoarding)

Bhujbal
Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

होर्डिंग कोसळल्यानंतर एकीकडे प्रशासन मदतकार्यात गुंतले असताना नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय धुरळा उडाला आहे. भाजपने या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. होर्डिंगच्या कंपनीचा मालक भावेश भिंडे आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र भाजपचे आमदार राम कदम यांनी शेअर करत या प्रकरणाचे खापर ठाकरे यांच्यावर फोडले आहे. त्यावर ठाकरे यांचा या प्रकरणात काय संबंध असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. ‘‘सरकार आमचे आहे, महानगरपालिकासुद्धा सध्या आमचीच आहे. मग यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध?,’’ अशी विचारणा त्यांनी केली आहे.

Bhujbal
जेवणापूर्वी अन् नंतर चहा-कॉफी घेणं का टाळावं?

‘राजकारण आणू नका’

‘‘राज्यात सरकार आमचे आहे. मुंबई महानगरपालिकासुद्धा सध्या आमच्याच ताब्यात आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे. राजकीय नेत्यांना अनेक लोक भेटण्यास येतात. व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि छायाचित्रे काढतात. यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही. या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

Bhujbal
Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

ते म्हणाले, ‘‘मुंबईत विमानतळावर जाताना, अशी अनेक होर्डिंग दिसतात. ही होर्डिंग समांतर हवी होती, पण ती रस्त्यावर आहेत. त्यांचे वजनही भरपूर आहे. अशा सर्व अनधिकृत होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे. वेळ न दवडता ती काढली पाहिजे. सर्व प्रशासकीय संस्थांनी त्यावर कारवाई करण्याची गरज आहे.’’

Bhujbal
Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

‘कडक कारवाई झाली पाहिजे’

होर्डिंगमुळे मृत्यू झालेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय होता? सरकार पाच लाख रुपये देईल. म्हणजे सगळे संपले का? या प्रकरणाची चौकशी करून कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. या होर्डिंगचा आकार जितका आकार असायला हवा होता त्या पेक्षा खूप मोठा होता. त्यामुळे कडक कारवाई झाली पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com