Gujarat Titans vs Kolkata Knight Riders sakal
IPL

IPL 2024 GT vs KKR : गिलच्या गुजरातसाठी विजय महत्त्वाचा! KKR चे पहिल्या क्रमांकांमध्ये राहण्याचे ध्येय

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders : कोलकता नाईट रायडर्स संघाने शनिवारी मध्यरात्री मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मान संपादन केला.

Kiran Mahanavar

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders : कोलकता नाईट रायडर्स संघाने शनिवारी मध्यरात्री मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मान संपादन केला. आता अव्वल दोन क्रमांकांमध्ये राहण्याचे ध्येय कोलकता संघाने बाळगले असेल. त्यामुळे गुजरात टायटन्सविरुद्धच्या आज (ता. १३) होत असलेल्या लढतीत कोलकता संघ विजयासाठी प्रयत्नशील असेल. गुजरातसाठी प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी कमी प्रमाणात आहे. चमत्कार झाल्यास त्यांचा संघ पुढे जाऊ शकतो; पण त्यासाठी गुजरातला उर्वरित लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्‍यक आहे.

सुनील नारायण (४६१ धावा व १५ विकेट) व आंद्रे रसेल (२२२ धावा व १५ विकेट) या दोन वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंनी कोलकता संघासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबींमध्ये निर्णायक क्षणी दोघांनी यश मिळवले आहे. त्यामुळे कोलकता संघाला या दोघांकडून उर्वरित लढतींसह प्ले ऑफमध्ये मोठी आशा असणार आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने मुंबईविरुद्धच्या लढतीत १७ धावा देत दोन फलंदाज बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला. त्याने आतापर्यंत १८ फलंदाज बाद केले आहेत. सुनील नारायण याच्यासह वरुण चक्रवर्ती फिरकीची धुरा सांभाळत आहे.

सुनील नारायण व फिल सॉल्ट (४३५ धावा) यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यर (२८७ धावा), व्यंकटेश अय्यर (२६७ धावा), रिंकू सिंग (१६८ धावा), अंगक्रीश रघुवंशी (१६३ धावा) यांच्या खांद्यावर कोलकता संघाच्या फलंदाजीची मदार आहे. रिंकू, अंगक्रीश व रमणदीप सिंग यांना अद्याप संस्मरणीय खेळी साकारता आलेली नाही. तसेच रिंकूला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागत असल्यामुळे फलंदाजी करताना अधिक चेंडूही खेळायला मिळालेले नाहीत. प्ले ऑफआधी संघ व्यवस्थापनाकडून पर्यायी खेळाडूंना संधी देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर निकालांवर अवलंबून

गुजरात संघाने मागील शुक्रवारी गतविजेत्या चेन्नईवर दमदार विजय साकारला. त्यामुळे त्यांचे आव्हान कायम राहिले. मात्र, गुजरातला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी स्वत:च्या निकालांसह इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. गुजरातला सर्वप्रथम स्वत:च्या दोन्ही लढतींत विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतर हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, लखनौ, बंगळूर या संघांच्या लढतींमधील निकालांची प्रतीक्षा त्यांना करावी लागणार आहे. या सर्व संघांचे निकाल मनाजोगते लागल्यास गुजरातचा प्ले ऑफमधील प्रवेश पक्का होऊ शकतो. सध्याच्या स्थितीवरून ही अवघड बाब वाटत आहे.

पहिल्या दोन स्थानांवर राहिल्यास दोन संधी

कोलकता संघ उर्वरित दोन लढतींत विजय मिळवण्याचा प्रयत्न करील. कारण गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर विराजमान झाल्यास अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी त्यांना मिळणार आहेत. क्वॉलिफायर वन लढतीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहणारे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात. एलिमिनेटर लढतीत तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघ आमने-सामने येतात. क्वॉलिफायर वन लढतीतील विजेता थेट अंतिम फेरीत पोहोचतो. तसेच या लढतीत पराभूत झालेला संघ एलिमिनेटर लढतीत विजयी झालेल्या संघाशी क्वॉलिफायर टू लढतीत सामना करतो. याचाच अर्थ साखळी फेरीअखेर पहिल्या दोन स्थानांवर असलेल्या संघांना फायनलमध्ये पोहोचण्याची दोन संधी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT