Harbhajan Singh Sanju Samson
Harbhajan Singh Sanju Samson esakal
IPL

Harbhajan Singh Sanju Samson : हरभजनने RR च्या 'या' खेळाडूची केली थेट धोनीशी तुलना; म्हणाला आता टीम इंडियात...

अनिरुद्ध संकपाळ

Harbhajan Singh Sanju Samson : आयपीएलच्या गतवर्षीच्या हंगामातील उपविजेता राजस्थान रॉयल्सने गतविजेत्या गुजरात टायन्सविरूद्ध झालेला अटीतटीचा सामना जिंकला. होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या गुजरातला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनने 32 चेंडूत 60 धावांची खेळी करत या विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर शिमरोन हेटमायरने या पायावर विजयी कळस चढवला.

दरम्यान, या विजयानंतर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने संजू सॅमसनचे तोंडभरून कौतुक केलं आहे. हरभजनने तर संजूची तुलना ही भारताचा महान कर्णधार एमएस धोनीशी करून टाकली. यानंतर संजूला आता भारतीय संघात सातत्याने खेळवले पाहिजे अशी वकिली देखील हरभजनने केली.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, 'आपण संजूकडून अजून एक कॅप्टन्स नॉक पाहिली. मी यापूर्वीही हे सांगिलं होतं. आणि माझा अजून त्यावर विश्वास आहे की संजूला भारतीय संघात सातत्याने संधी द्यायला हवी. तो फरकी आणि वेगवान गोलंदाजांना तितक्यात सक्षमतेने खेळू शकतो. त्याला दबाव कसा हाताळायचा हे देखील माहिती आहे. तो इच्छाशक्ती असलेला खेळाडू आहे. धोनीप्रमाणे त्याला त्याच्या क्षमतांवर विश्वास आहे.'

गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात 178 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात खराब झाली होती. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानचा डाव सावरला. संजूने आक्रमक खेळ करत धावांची गती वाढवली. तर पडिक्कल स्ट्राईक रोटेट करत होता. अखेर राशिदने पडिक्कलला बाद केले. त्यानंतर रियान पराग देखील 5 धावा करून बाद झाला.

यानंतर कर्णधार संजू सॅमसनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याच्या साथीला आलेल्या शिमरॉन हेटमायरने देखील उत्तम साथ देत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. यानंतर हेटमायरने सामना 4 चेंडू शिल्लक असतानाच संपवला.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT