Harbhajan Singh Trolled After Virat Kohli Out on Golden Duck
Harbhajan Singh Trolled After Virat Kohli Out on Golden Duck  ESAKAL
IPL

Virat Kohli | विराट गोल्डन डकवर बाद अन् ट्रोल झाला हरभजन सिंग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सनराईजर्स हैदराबादने (SunRisers Hyderabad) रॉयल चॅलेंजर बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) 68 धावात गुंडाळत सामना आपल्या खिशात टाकला होता. त्यानंतर एका फलंदाजाच्या मोबदल्यात हे 68 धावांचे आव्हान त्यांनी आठव्या षटकातच पार करत विजयी औपचारिकता पूर्ण केली. दरम्यान, या सामन्यात मार्को जेनसेनने टाकलेल्या दुसऱ्या षटकाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्याने या षटकात फाफ ड्युप्लेसिस, विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुज रावत यांची शिकार केली. विराट कोहली तर सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर (Golden Duck) बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या पोस्टचा पूर आला. विराटचे अनेक चाहते दुःखी होते. दरम्यान, काही चाहत्यांनी तर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगलाच (Harbhajan Singh Troll) ट्रोल करण्यास सुरूवात केली.

त्याचं झालं असं की, हरभजन सिंगने आरसीबीचा सामना सुरू होण्यापूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये तो म्हणत होता की, मला असे वाटते की आज विराट कोहली मैदानावर धमाका करेल. तो आपल्या धडाकेबाज खेळीने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल.' मात्र झालं त्याच्या बरोबर उलटं. हैदराबादकडून दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मार्को जेनसेनने षटकात तीन आरसीबीचे मोठे मासे गळाला लावले. त्याने पहिल्यांदा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीला आल्या पावली मागे फिरायला लावले. तो यावरच थांबला नाही तर त्याने आरसीबीचा दुसरा सलामीवीर अनुज रावतला देखील भोपळा फोडू दिला नाही.

जसा विराट शुन्यावर बाद झाला तसे नेटकऱ्यांनी हरभजनच्या ट्विटवरून त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका युजरने तू कृपा करून गप्प बस अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने तू पनवती आहेस असे म्हणत विराटच्या खराब कामगिरीवर हरभजनलाच दुषणे दिली.

दरम्यान, खराब सुरूवात करणारी आरसीबी पुनरागमन करू शकली नाही. त्यांचा संपूर्ण डाव 68 धावात संपुष्टात आला. त्यानंतर हैदराबाने अभिषेक शर्माच्या 47 धावांच्या खेळीच्या जोरावर हे आव्हान 8 व्या षटकातच पार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT