Sandeep Sharma X/rajasthanroyals
IPL

RR vs MI, IPL:'दोन वर्षांपूर्वी अनसोल्ड राहिलो, त्यामुळे...', मुंबईविरुद्ध सामनावीर झालेला संदीप शर्मा भावूक

Sandeep Sharma: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेत संदीप शर्माने राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

Pranali Kodre

Sandeep Sharma 5 Wickets: सोमवारी (२२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील ३८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला ९ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा राजस्थानचा या हंगामातील सातवा विजय ठरला आहे. दरम्यान, राजस्थानच्या या विजयात वेगवान गोलंदाज संदीप शर्माने मोलाचा वाटा उचलला.

संदीपने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 18 धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यामुळए त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर संदीप त्याच्या कारकिर्दिबाबत भावूक झाला होता. आधी त्याने त्याच्या कामगिरीबद्दल भाष्य केलं आणि नंतर त्याच्यासाठी प्रत्येक सामना का महत्त्वाचा आहे, हेही सांगितले.

तो म्हणाला, 'मी कालच तंदुरुस्त झालो आहे. तंदुरुस्ती मिळवल्यानंतर हा माझा पहिलाच सामना होता. खूप छान वाटत आहे. खेळपट्टी थोडी धीम्या गतीची होती, त्यामुळे माझी योजना गोलंदाजीत विविधता ठेवण्यावर आणि कटर टाकण्याची होती.'

'जर तुम्ही डावाच्या शेवटी गोलंदाजी करणार असाल, तर तुमचे मनही मोठे हवे (कारण अधिक धावा निघू शकतात.) आयपीएलमध्ये पाहिले आहे की गोलंदाज दबावात येतात, पण मोठे मन ठेवून आपल्या योजना अंमलात आणायला हव्यात.'

याशिवाय त्याने असेही म्हटले की दोन वर्षांपूर्वी आयपीएल लिलावात त्याच्यावर कोणत्या संघाने बोली लावली नव्हती, याची जाणीव त्याला आहे. संदीप म्हणाला, 'दोन वर्षांपूर्वी मी अनसोल्ड राहिलो होतो, त्यानंतर मला बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली, त्याचमुळे मी प्रत्येक सामन्याचा आनंद घेत खेळत आहे.'

संदीपला राजस्थान रॉयल्सने 2023 आयपीएल हंगामात दुखापतग्रस्त प्रसिध कृष्णाच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून संधी दिली होती. त्यानंतर त्याला आयपीएल २०२४ साठीही कायम करण्यात आले. संदीपने 2023 पासून आयपीएलमध्ये १५ सामने खेळले असून १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची किफायतशीर गोलंदाजी राजस्थानसाठी महत्त्वाची ठरत आहे.

संदीप शर्माची मुंबईविरुद्ध कमालीची गोलंदाजी

संदीप शर्माने मुंबईच्या ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जेराल्ड कोएत्झी आणि टीम डेविड अशा फलंदाजांना बाद केलं होतं. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 9 बाद 179 धावांवरच रोखण्यात राजस्थानला यश मिळाले. नंतर राजस्थानने 180 धावांचे आव्हान यशस्वी जैस्वालच्या (104*) शतकाच्या जोरावर सहज पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT